अजूनही काँगेसला सावरकरांची भीती.. शेंबडं पोरगं म्हणत राहुल गांधींवर पोंक्षेंची टीका..

मुंबई: सध्या गांधी आणि सावरकर या राजकारणातील एक ज्वलंत विषय झालेला आहे. दोन्ही महापुरुषांचे समर्थक आपापल्या विचारधारेला प्रमाण मानून तूफान राडेबाजी करत आहेत. त्यामुळे राजकीय आखाड्यात रोज डाव पाहायला मिळत आहे.पंतप्रधान मोदींवर टीका केली म्हणून सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेने काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. त्यानंतर राहुल गांधी यांना माफी मागा असे सांगण्यात आले. पण 'माफी मागायला मी काही सावरकर नाही.. गांधी आहे.. आणि गांधी कधीही झुकत नाही' असे विधान राहुल गांधी यांनी केले होते.



यावरून देशभरात बराच कोलाहल सुरू आहे. अशातच शरद पोंक्षे यांनी एक व्हिडिओ शेयर करत कॉँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.पोंक्षे म्हणतात, '''सावरकर नावाची दहशत.. संपूर्ण हिंदुस्तानच्या त्यावेळच्या ३६ करोंड लोकांना सगळ्यात कोण डेंजरस वाटत होतं तर विनायक दामोदर सावरकर. आज स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली तरीही कॉँग्रेसला मोस्ट डेंजरस माणूस कोण वाटतो तर विनायक दामोदर सावरकर.. आता ते गेलेत खरं तर, पण त्यांच्या नावाचीही एवढी दहशत आहे की, त्यांच्या बद्दल चांगलं बोलायला लागलं, ते जर पसरायला लागले, ते जर लोकप्रिय व्हायला लागले, त्यांचे विचार कळायला लागले आणि त्यातून जर दहा सावरकर निर्माण झाले तर काय करायचं. एक सावरकर अख्ख्या ब्रिटिश साम्राज्याला पुरून उरला तर हे दिल्लीतलं शेंबडं पोरगं काय आहे..त्याला आम्हीच पुरून ऊरु, सावरकरांची गरज नाही.''

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने