मलेरिया ठरू शकतो जीवघेणा, वेळीच लक्षणं ओळखा नाहीतर...

दिल्ली: कुठल्याही आजाराची सुरुवाती लक्षणं माहिती असली की तो आजार जडल्यास आपण ताबडतोब उपचार घेत बरे होऊ शकतो. मात्र काहींना आजारांची लक्षणे माहिती नसल्याने व ती वेळीच ओळखता न आल्याने त्यांना त्यांचा जीवसुद्धा गमवावा लागतो. आज जागतिक मलेरिया दिवस आहे. मलेरिया हा डास चावल्याने होणारा आजार असून याची लक्षणे वेळी ओळखल्या गेली नाही तर तुमच्या जीवालासुद्धा धोका होऊ शकतो. तेव्हा जाणून घेऊया मलेरिया आजारात कोणती सुरूवाती लक्षणं जाणवतात ते.मलेरियाचा संसर्ग पसरवणारा डास जेव्हा एखाद्याला चावतो तेव्हा त्याच्या लक्षणे दिसायला कमीत कमी ७ दिवस आणि जास्तीत जास्त ३० दिवस लागतात. अशात तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असल्यास तुमच्या जीवालाही धोका उद्भवू शकतो.

मलेरिया कसा होतो?

मलेरिया हा डासांमुळे पसरणारा आजार आहे. मलेरिया ताप अॅनोफिलीस या डासामुळे होतो. अॅनोफिलीस मादी डासात एक विशेष प्रकारचा विषाणू आढळतो ज्याला सायन्टिफिक भाषेत प्लास्मोडियम म्हणतात. प्लास्मोडियाच्या एकून पाच प्रजाती असून या सगळ्या प्रजाती व्यक्तीस संक्रमित करण्यास कारणीभूत ठरतात.



जाणून घ्या मलेरियाचे पाच प्रकार

  • प्लाज्मोडियम फाल्सिपेरम

  • प्लास्मोडियम मलेरिया

  • प्लास्मोडियम व्हायवॅक्स

  • प्लास्मोडियम ओव्हल

  • प्लास्मोडियम नोलेसी

मलेरियाची लक्षणे

  • थंडी वाजून ताप येणे

  • शरीरातील तापमानाचा पारा वाढणे

  • डोकेदुखी

  • उलट्या

  • अशक्तपणा

  • स्नायू दुखणे

  • घसा खवखवणे

  • घाम येणे

  • थकवा जाणवणे

  • अस्वस्थ वाटणे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने