...म्हणून झाला होता आनंदमठ अन् वंदेमातरम् वर वाद

बंगाल: वंदेमातरम् चे रचेता कवी बंकीमचंद्र चटर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या साहित्यावर बोलणं योग्य राहील. विशेष म्हणजे बांगला साहित्यात या महान साहित्यिकाची सर्वात चर्चेत असणारी रचना म्हणजे आनंदमठ, कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकली. त्यामुळेच यातील वंदे मातरम ही गीतपण वादात अडकलं.टिकाकार हे विसरून जातात की, आनंदमठ ही एक कादंबरी आहे, इतिहास नाही. त्‍याच्‍या वातावरणाचा प्रभाव त्‍यावर झाला आणि 1882 मध्‍ये पुस्‍तकाच्‍या स्‍वरूपात प्रकाशित होण्‍यापूर्वी 'बंगदर्शन' या नियतकालिकात ती मालिका म्हणून प्रसिद्ध झाली.

काय आहे किस्सा?

हा किस्सा १७७० च्या आसपासचा आहे. बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी बंगाल राज्यकर्ते मुस्लिम नवाब आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या युती करण्यात गुंतलेला होता. याला विरोध करत तेथील भिक्षूंनी आंदोलन सुरू केले. कादंबरीचा नायक महेंद्रसिंग आपल्या पत्नी आणि मुलीसह गाव सोडून शहरासाठी निघतो, पण वाटेत त्यांच्यापासून विभक्त होतो. त्याला लुटारू समजून इंग्रज सैनिक एका संन्यासी भवानंदसह पकडतात.मात्र भावनंदच्या साथीदारांच्या मदतीने दोघांचीही लवकरच सुटका झाली आहे. आता भावानंद पुढे चालला आहे आणि महेंद्रसिंग त्याच्या मागे आहे. भवानंद चांदण्या रात्री गाऊ लागतात,



‘वंदे मातरम्!

सुजलां सुफलां मलयजशीतलाम

शस्यश्यामलां मातरम...’

वंदे मातरमचा सगळ्यात पहिले उल्लेख बंकिम चंद्र चटर्जी द्वारा रचित कादंबरी ‘आनोंदोमोठ’ म्हणजेच आनंदमठ मध्ये मिळतो. असं सांगितलं जातं की, या गीताचे पहिले दोन छंद त्यांनी 1872 ते1875 मध्ये लिहिले होते. पण त्यांनी सगळ्यात पहिले 1881 मध्ये आनंदमठचा भाग म्हणूनच त्याला सादर केलं होतं. पुढे जाऊन ते गीत क्रांतीकारकांचा प्राणमंत्र बनला.एकीकडे या रचनेने लोक त्यांची निंदा करत होते तर दुसरीकडे अरविंद घोष यांच्यासारखे क्रांतीकारक वंदे मातरम सारख्या अदभूत रचनेसाठी त्यांना राष्ट्रवादाचा ऋषी म्हणून संबोधत होते.

वाद काय होते?

  • उपल्बध माहितीनुसार नामवर सिंह नामक एक टिकाकार म्हणतात की, आनंदमठ ही कादंबरी पहिले इंग्रजांविरुद्ध लिहिली गेली. पण सरकारी नोकर असल्याने वरीष्ठांच्या दबावाने तुला मुस्लिम विरोधी बनवलं.

  • वंदे मातरम रचनेत फक्त बंगालच्या भौगोलिक स्थितीचे वर्णन आहे. त्याच्याशी इर प्रांतांचा संबंध नाही. कारण ही रचनाच मुळात बंगाल प्रांतात घडणाऱ्या कथेवर आधारीत कादंबरीतली आहे.

  • वंदे मातरम हे क्रांतीकारकांचा मूलमंत्र झाला होता. भारत माता की जय तर म्हणतच पण वंदे मातरम ही म्हणत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने