काँग्रेसने मोदींना 'साप' म्हटल्यावर भाजपासाठी सोनिया गांधी झाल्या 'विषकन्या'

दिल्ली: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना ‘विषारी साप’ असं म्हटलं. त्यानंतर आता कर्नाटकचे भाजप आमदार बसनागौडा यांनीकाँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना ‘विषकन्या’ म्हटलं आहे.“संपूर्ण जगाने पंतप्रधान मोदींना स्वीकारलं आहे. एकेकाळी अमेरिकेने त्यांना व्हिसा देण्यास नकार दिला होता. त्यांनी नंतर रेड कार्पेट अंथरून मोदींचं स्वागत केलं. आता ते (काँग्रेस) त्याची तुलना कोब्रा सापाशी करत आहेत आणि म्हणत आहेत की तो विष टाकेल. सोनिया गांधी विषकन्या आहे. त्यांनी चीन आणि पाकिस्तानबरोबर त्यांचे एजंट म्हणून काम केलं आहे,” असं विधान आमदार बसनागौडा यांनी केलं आहे.काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत ‘मोदी हे विषारी सापासारखे आहेत’, असे वक्तव्य केल्यानंतर या भाजपा आमदाराने हे विधान केलं आहे.



मल्लिकार्जुन खर्गेंचा यु-टर्न

काँग्रेस प्रमुखांच्या टीकेचा मोठा विरोध झाला आणि खर्गे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर खर्गे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की, “भारतीय जनता पक्ष सापासारखा आहे. जर तुम्ही चाटण्याचा प्रयत्न केला तर शेवटी तुम्ही मराल. मी पंतप्रधान मोदींबद्दल बोललो नाही. मी वैयक्तिक विधानं करत नाही. मला म्हणायचं आहे की त्यांची विचारधारा सापासारखी आहे. जर तुम्ही चाटण्याचा प्रयत्न कराल तर मृत्यू अटळ असेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने