एक किलो गांजामुळे भारतीय वंशाच्या व्यक्तीला चक्क फाशी; वाचा अजब सिंगापूरचे गजब कायदे

सिंगापूर: सिंगापूरमध्ये एक किलो गांजा तस्करीप्रकरणी भारतीय वंशाच्या एका व्यक्तीला चक्क फाशी देण्यात आली. व्यक्तीला फाशी होऊ नये, अशी याचिका दाखल करण्यात आली होती मात्र ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली.भारतात गांजा तस्करी प्रकरणी फाशी झालेले प्रकरण तुम्ही कधीच वाचले किंवा ऐकले नसेल पण सिंगापूरमध्ये असं होतं. सिंगापूरमध्ये आणखी असे अनेक कायदे आहेत जे वाचून तुम्हालाही धक्का बसेल. प्रत्येक देशाचे वेगवेगळे कायदे आहेत आणि या कायद्याचं पालन करणे हे त्या देशाचे नागरीकांचे कर्तव्य आहे पण जर हे कायदे तुमच्या स्वातंत्र्यावर किंवा तुमच्या व्यक्तिगत जीवनावर बंधन लादत असेल तर.. तुम्ही म्हणाल, असे कुठे आहे? सिंगापूरमध्ये असे अजब गजब कायदे आहेत. आज आपण अशाच अजब गजब काही कायद्यांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया.



  • सिंगापूरमध्ये सार्वजनिक ठिकाणी च्‍युइंगम खाणे कायद्याने गुन्हा आहे. जर कोणी सार्वजानिक ठिकाणी च्‍युइंगम खाताना दिसेल तर त्याला 100,000 डॉलर म्हणजेच 64, 87, 500 लाख रुपयांचा दंड भरावा लागेल सोबतच दोन वर्षांची जेलही होऊ शकते.

  • अनेकदा पब्‍लिक टॉयलेट वापरताना लोक फ्लश वापरणे, विसरतात तर काही लोक चुकीच्या सवयीमुळे असे करतात पण सिंगापूरमध्ये तुम्ही असं करत असाल तर हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी गुन्हेगाराला 10,000 रुपयांचा दंड भरावा लागतो.

  • अनेक लोकांना कपडेविना घरी वावरायची सवय असते पण तुम्ही सिंगापूरमध्ये असाल तर तुम्ही असं करू शकत नाही. सिंगापूरमध्ये घरी कपडेविना फिरत असाल तर तुम्हाला 1,30,000 रुपयांचा दंड भरावा लागतो आणि तीन महिन्याची जेल होऊ शकते.

  • पक्ष्यांना दाणे टाकणे, त्यांना पाणी प्यायला देणे, भारतात समाजसेवेचा भाग समजला जात असला तरी सिंगापूरमध्ये असे करणे कायद्याने गुन्हा आहे. सिंगापुरमध्ये तुम्ही कबूतरला दाणे टाकताना दिसला तर तुम्हाला 33,000 रुपयांची जेल होऊ शकते.

  • भारतात सार्वजानिक ठिकाणी आपण अनेकदा एकमेकांचे किंवा स्थानिक फ्री वाय-फायचा वापर करतो. भारतात जरी ही खूप साधारण गोष्ट असली तर सिंगापूरमध्ये नाही कारण सिंगापूरमध्ये असं करणे चुकीचं आहे आणि कायद्याने गुन्हा आहे.

    कोणत्याही परवानगीशिवाय तुम्ही वाय-फाय यूज करत असाल तर तुम्हाला दंड आणि तीन वर्षाची जेल होऊ शकते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने