जगातील ७५ टक्के वाघ भारतात,पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

बंगळूर:  ‘प्रोजेक्ट टायगर’चे यश केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी अभिमानाची बाब आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच वेळी, जगातील वाघांच्या संख्येच्या ७५ टक्के वाघ भारतात आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’चा प्रारंभ करताना, मोदींनी येथील राज्य मुक्त विद्यापीठाच्या घटकोत्सव भवनात व्याघ्र प्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या स्मरणार्थ नाणी जारी केली. ते म्हणाले की, ‘हा वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा एक मार्ग आहे. निसर्गाची पूजा करणारा हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे. व्याघ्र योजनेला ५० वर्षे पूर्ण होणे हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. केवळ भारतात वाघांचे संरक्षण नाही, तर त्यांची भरभराट करण्यासाठी सर्वोत्तम परिसंस्था प्रदान केली गेली आहे.



काही दशकांपूर्वी बिबट्या नामीबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणला. हे पहिले यशस्वी स्थलांतर आहे. सुमारे ३० हजार हत्तींसह भारत हा जगातील सर्वांत मोठा आशियायी हत्ती देश असल्याची माहितीही त्यांनी दिली. १९७३ मध्ये नऊ व्याघ्र प्रकल्पांसह सुरू झालेली व्याघ्र संवर्धन योजना ५३ राखीव क्षेत्रापर्यंत पोहोचली आहे. २३ व्याघ्र संरक्षित क्षेत्रांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली. ‘’प्रोजेक्ट टायगर’’च्या ५० वर्षांच्या स्मरणार्थ उद्‍घाटन सत्रात, पंतप्रधानांनी ‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ देखील लॉन्च केले, जे वाघ आणि सिंहांसह जगातील सात मोठ्या मार्जार कुळातील प्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनावर लक्ष केंद्रित करेल.

काही दशकांपूर्वी बिबट्या नामीबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणला. हे पहिले यशस्वी स्थलांतर आहे. सुमारे ३० हजार हत्तींसह भारत हा जगातील सर्वांत मोठा आशियायी हत्ती देश असल्याची माहितीही त्यांनी दिली. १९७३ मध्ये नऊ व्याघ्र प्रकल्पांसह सुरू झालेली व्याघ्र संवर्धन योजना ५३ राखीव क्षेत्रापर्यंत पोहोचली आहे. २३ व्याघ्र संरक्षित क्षेत्रांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली.'प्रोजेक्ट टायगर''च्या ५० वर्षांच्या स्मरणार्थ उद्‍घाटन सत्रात, पंतप्रधानांनी ‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ देखील लॉन्च केले, जे वाघ आणि सिंहांसह जगातील सात मोठ्या मार्जार कुळातील प्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनावर लक्ष केंद्रित करेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने