‘ड्रॅगन’ चे सैनिक युद्धासाठी सज्ज!

बीजिंग - तैवानच्या नजीक सलग तीन दिवस मोठा युद्धसराव केल्यानंतर, ‘आम्ही लढण्यासाठी तयार आहोत,’ असा इशारा चीनच्या लष्कराने आज दिला आहे. तैवानच्या अध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या अमेरिका दौऱ्यानंतर चीनने संतप्त होत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.चीनने तैवानला इशारा देताना मागील तीन दिवस मोठा युद्धसराव केला होता. यामध्ये त्यांनी तैवानच्या हवाई हद्दीजवळून लढाऊ विमानांची अनेक उड्डाणे केली होती. तैवानच्या सागरी हद्दीनजीक युद्धनौकाही आणून ठेवल्या होत्या.



तैवान हा चीनचाच भाग आहे, हा आपला दावा जगाने मान्य करावा अशी इच्छा असलेल्या चीनला तैवानने इतर देशांशी स्वतंत्रपणे राजकीय संबंध निर्माण करावेत, हे मान्य नाही. त्यामुळेच इंग-वेन यांच्या दौऱ्यानंतर चीनने तीव्र नाराजी व्यक्त करत युद्धसराव घेतला होता.या युद्धसरावानंतर,‘कोणत्याही क्षणी युद्ध करण्यासाठी आमची सर्व संरक्षण दले सज्ज आहेत. तैवानचा स्वातंत्र्याचा दावा आणि परकी शक्तींचा हस्तक्षेप आम्ही चिरडून टाकू,’ असे चीनच्या लष्कराने जाहीर केले आहे. अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहाच्या तत्कालीन अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यानंतर चीनने अशाच प्रकारचा युद्ध सराव घेतला होता. मात्र, यावेळी त्यांची व्याप्ती मोठी होती.

युद्धसरावा दरम्यान चीनने तैवानची सागरी आणि हवाई कोंडी केली होती. तैवानचा ताबा मिळविण्यासाठी चीनला सैन्यबळाचा वापर करावा लागल्यास ते याच मार्गाचा पुन्हा वापर करू शकतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.नुकत्याच झालेल्या सरावादरम्यान चिनी हवाई दलाच्या शँडोंग या लढाऊ विमानांनी तैवान भोवती घिरट्या घातल्या होत्या. तैवानचा ताबा घेण्यासाठी चीनने लष्कराचा वापर केल्यास इतर देशांना हस्तक्षेप करण्यापासून रोखण्यासाठी या विमानांचा वापर होऊ शकतो, असेही तज्ज्ञांनी सांगितले.चीनची वर्तणूक एका शक्तिशाली देशासारखी नाही. माझ्या अमेरिका दौऱ्याचे निमित्त करून चीनने युद्ध सराव सुरु केला आणि तणावाचे वातावरण निर्माण केले आहे. चीनचे असे वागणे म्हणजे त्यांनी युद्धाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने