बोरघाटाच्या अपघातातील जखमींची नावे जाहीर, झांज पथकातील वादकांचा होता समावेश

मुंबई : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिंगरोबा मंदिराच्या मागे असलेल्या दरीमध्ये पहाटेच्या सुमारास खासगी बस कोसळली. या अपघातामध्ये आत्तापर्यंत 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज पहाटे 4 वाजता हा भीषण अपघात झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.पुण्यातील जयंतीचा कार्यक्रमावरून परत येत असताना प्रवाशांवर काळाने घाला घातला. या प्रवाशांमध्ये गोरेगावाच्या बाजीप्रभू ढोलताशा पथकाचे कार्यकर्तेही होते. त्यातील काहीजण अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, दरीत रेस्क्यूचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.ही खासगी बस पुण्यावरून मुंबईला जात होती. पहाटे 4च्या सुमारास ही बस जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागे येताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे खासगी बस दरीत कोसळली. ही दरी 400 ते 500 फूट खोल आहे. या बसमधून 40 ते 45 प्रवाशी प्रवास करत होते. त्यापैकी 13 जणांचा जागीच मृत्यू झाला.



या अपघातातील जखमींची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

1) नम्रता रघुनाथ गावणूक, वय 29

2) चंद्रकांत महादेव गुडेकर, वय 29 गोरेगाव.

3) तुषार चंद्रकांत गावडे, वय 22 गोरेगाव.

4) हर्ष अर्जुन फाळके, वय 19 गोरेगाव.

5) महेश हिरामण म्हात्रे, वय 20 गोरेगाव.

6) लवकुश रंजित कुमार प्रजाती, वय 16 गोरेगाव.

7) आशिष विजय गुरव, वय 19, दहिसर.

8) सनी ओमप्रकाश राघव, वय 21, खालची खोपोली.

9) यश अनंत सकपाळ, वय 19, गोरेगाव.

10) वृषभ रवींद्र थोरवे, वय 14-गोरेगाव.

11) शुभम सुभाष गुडेकर, गोरेगाव.

12) जयेश तुकाराम नरळकर, वय 24 कांदिवली.

13) विशाल अशोक विश्वकर्मा, वय 23 कांदिवली.

14) रुचिका सुनील धूमणे, वय 17, गोरेगाव.

15) ओम मनीष कदम, वय 18, गोरेगाव.

16) युसूफ उनेर खान, वय 14, गोरेगाव.

17) अभिजित दत्तात्रय जोशी, वय 20, रत्नागिरी.

18) कोमल बाळकृष्ण चिले, वय 15, मुंबई.

19) हर्ष वीरेंद्र दुरी, वय 20, कांदिवली.

20) ओमकार जितेंद्र पवार, वय 24, खोपोली, सोमजाई वाडी ळ.

21) दिपक विश्वकर्मा, वय 21, कांदिवली.

22) हर्षदा परदेशी

23) वीर मांडवकर

24) मोहक दिलीप सालप, वय 18. मुंबई.

मयत

1) जुई सावंत, वय 15, गोरेगाव.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने