कुत्रे, मांजरेही करणार आता ट्रेनमधून प्रवास

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे मंत्रालयाने आता कुत्रे-मांजरांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी आपल्या पाळीव प्राण्यांना सोबत घेऊन ट्रेनचा प्रवास करू शकणार आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कुत्रे आणि मांजरींसाठी तिकीट बुक करण्याचा अधिकार टीटीईला देण्याचाही विचार केला जात आहे. त्यामुळे आता प्राणीप्रेमी एसी-१ क्लासमध्ये कुत्रे आणि मांजरींसाठीही तिकीट काढू शकतात.




आतापर्यंत प्रवाशांना त्यांचे पाळीव कुत्रा किंवा मांजर सेकंड क्लासच्या सामान आणि ब्रेक व्हॅनमध्ये डॉग बॉक्समध्ये नेण्याची परवानगी होती. त्याचबरोबर पाळीव प्राण्यांना ट्रेनमध्ये नेण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या पार्सल बुकिंग काउंटरवर तिकीट बुक करावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. याच पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालय आता कुत्रे आणि मांजरांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुविधा सुरू करण्याचा विचार करत आहे. यासाठी आयआरसीटीसीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात येणार आहेत, जेणेकरून पाळीव प्राण्यांच्या ऑनलाइन बुकिंगची सुविधा सुरू करता येईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने