ड्रॅगन फ्रूटचे फायदे वाचाल तर चक्रावून जाल; कॅन्सरलाही करतो धोबीपछाड!

मुंबई : तब्येत बिघडल्यावर लोक लाखो रुपये खर्च करायला मागे पुढे पाहत नाहीत. पण त्याऐवजी सात्विक आहारावर खर्च करायला ते टाळाटाळ करतात.

पण, खरं तर फळ, पालेभाज्या असे पदार्थ खाण्यातच सगळ्यांच भलं आहे. फळांमधून आपल्याला मिळणारे पोषक घटकच आपलं रक्षण करू शकतात.

आज आपण अशाच एका फळाबद्दल माहिती घेणार आहोत. जे तुमच्यासाठी अमृतच ठरते. ज्यामुळे कॅन्सरसारखा आजारावरही मात करता येऊ शकते. ते फळ आहे ड्रॅगन फ्रूट. आज आपण त्याचेच फायदे जाणून घेऊयात.

ड्रॅगन फ्रुट हे फळ उष्ण भागात तर येतेच, परंतु ते पाण्याच्या कमी प्रमाणावर देखील येते त्यामुळे पाण्याचा ज्यठिकाणी दुष्काळ असतो त्याठिकाणी या ड्रॅगन फ्रुटच्या बागेची लागवड जास्त प्रमाणात केली जाते.




आपल्या भारतात ड्रॅगन फ्रुटची सर्वाधिक लागवड ही  महाराष्ट्, केरळ , कर्नाटक,  गुजरात, ओडिसा, अंदमान निकोबार बेट, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यात हे पीक फळ सर्वाधिक प्रमाणात घेतले जाते. अलीकडच्या काळात ड्रॅगन फ्रुटची मागणी हि मोठ्या प्रमाणावर वाढली त्यामुळे हि फळबाग लागवड जास्त प्रमाणात केली जात आहे.

ड्रॅगन फळापासून पोषण  

- प्रथिने: २ ग्रॅम

- फायबर: ३-५ ग्रॅम

- चरबी: ० ग्रॅम

- कर्बोदकांमधे: २२ ग्रॅम

- मॅग्नेशियम:  १०%

- व्हिटॅमिन सी,बी , ए :

- लोह: ०.१ मिलिग्रॅम 

- कॅलरीज: ६०

- साखर: १३ ग्राम  

कॅन्सरवर उपयोगी

आपल्या शरीरातील रक्तपेशींमध्ये होणारे बदल कर्करोगाला वाढण्याची संधी देतात. त्यामुळे ड्रॅगन फ्रूटचे सेवन करावे.  ड्रॅगन फ्रूटमध्ये फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक अॅसिड आणि बीटासामाइन सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात जे नैसर्गिकरित्या फ्री रॅडिकल्स काढून टाकतात.

फ्री रॅडिकल्समुळे ऑक्सिडेटिव्ह ताण येतो आणि पेशींच्या डीएनएमध्ये बदल होतो. त्यामुळे फ्री रॅडिकल्स कमी झाल्यास कॅन्सरचा धोकाही कमी होईल.  

वजन कमी करण्यास मदत करते

ड्रॅगन फ्रूटमध्ये भरपूर फायबर असते. स्नॅक म्हणून हा एक चांगला पर्याय असू शकतो. सकाळी खाल्ल्यास दिवसभर भूक लागत नाही. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी ड्रॅगन फ्रूट जबरदस्त काम करू शकते.

हृदयासाठी फायदेशीर

ड्रॅगन फ्रूटमध्ये लहान काळे बिया असतात. या बियाण्यांमध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-9 फॅटी अॅसिड ्स आढळतात. दुसरीकडे ड्रॅगन फ्रूटमधील चरबी नगण्य असते. त्यामुळे हृदय निरोगी राहते आणि कोलेस्टेरॉल वाढू देत नाही.  

मधुमेह नियंत्रणात ठेवते

ड्रॅगन फ्रूट नैसर्गिकरित्या रक्तातील साखर कमी करते. ड्रॅगन फ्रूटच्या सेवनाने स्वादुपिंडातून इन्सुलिनचे उत्पादन योग्य होते, हेही एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. जेव्हा इन्सुलिन कमी असते तेव्हा रक्तातील साखर वाढते. म्हणजेच ड्रॅगन फ्रूट नैसर्गिक पद्धतीने इन्सुलिन वाढवू शकते.  

प्रतिकारशक्ती वाढते

ड्रॅगन फ्रूट रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. ड्रॅगन फ्रूटमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने