भेसळयुक्त Earthen Pot मुळे होवू शकतात ‘हे’ आजार? माठ खरेदी करताना ही काळजी घेणं गरजेचं

महाराष्ट्र : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकजण गार पाण्यासाठी मातीचे माठ खरेदी करतात. फ्रिजमधलं गार पाणी पिणं हे आरोग्यासाठी Health हानीकारक असल्याने अर्थातच माठ Earthen Pot हा गार पाण्यासाठी एक योग्य पर्याय आहे. माठातील गार पाणी प्यायल्याने आरोग्याच्या कोणत्याही समस्या निर्माण होत नाहीत. उलट ते आरोग्यसाठी फायदेशीर असत.

मातीच्या भांड्यातील पाणी हे नैसर्गिकरित्या अल्कलाइन असतं. यामुळे डिहायड्रेशन होत नाही. तसचं माठातील गार पाणी प्यायल्याने घशाच्या समस्या होण्याचा धोका नसते. मात्र यासाठी मातीचं भांडं किंवा माठ हा शुद्ध मातीपासून तयार करण्यात आलेला असावा. अलिकडे बाजारामध्ये माठांना आकर्षक आणि टिकाऊ बनवण्यासाठी केमिकल्सचा वापर केला जात आहे. या माठासाठी वापरण्यात आलेल्या मातीत भेसळ असते किंवा त्यासाठी पेंट वापरण्यात आलेला असतो. हे पाणी आरोग्यासाठी योग्य नाही. 


असे मातीचे माठ बनवताना सिलिकेट सोडा टाकला जातो आणि तो कॉस्टिक पद्धतीने बनवला जातो. तसचं बाहेरुन तर पेंटचा वापर केला जातोच शिवाय आतूनही पेंट वापरण्यात येतो. हा पेंट हळू हळू पाण्यात मिसळला जातो. यामुळे तोंडात इंफेक्शन होण्याची शक्यता असते. यासाठी माठ खरेदी करताना काही गोष्टींची दक्षता घेणं गरजेंचं आहे. 

साधा माठ घ्या- बाजारामध्ये अलिकडे कलाकुसर केलेले तसच रंगकाम केलेले आकर्षक माठ येतात. मात्र या माठांना आतूनही रंग देण्यात आलेला असतो. त्यामुळे या माठांकडे आकर्षित होवू नका. कारण पेंटमुळे पाण्याची चव बिघडू शकते. एवढचं नव्हे तर पेंटमधील ऑइल हळू हळू पाण्यामध्ये मिसळल्याने घशाला इन्फेक्शन होवू शकतं. 

आतून पेंट केलेल्या माठातील पाण्याला एथिलीनचा वास येऊ शकतो. या माठातील पाण्याचं सतत सेवन केल्याने पोटाच्या समस्यादेखील निर्माण होवू शकतात. 

माठातील पाण्याचा वास घ्या- माठ खरेदी केल्यानंतर त्यात पाणी भरून या पाण्याचा वास घ्या. शुद्ध मातीपासून तयार करण्यात आलेल्या माठाला मातीचा एक सुगंध येतो. जर पाण्याला कोणताच वास येत नसेल किंवा एखादा तेलकट किंवा केमिकलचा वास येत असल्यासं असा माठ वापरू नका. 

कुंभाराकडूनच माठ खरेदी करा- अलिकडे एखाद्या छोट्या कारखान्यात मोल्डचा वापर करून माची भांडी आणि मडकी तयार केली जातात. मोल्डमध्ये तयार करण्यात भांड्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मातीत अनेकदा भेसळ केली जाते. यासाठीच शक्य असल्यास तुमच्या परिसरातील एखाद्या कुंभाराकडून मडकं किंवा माठ खरेदी करा. 

याशिवाय माठ खरेदी करताना इतरही काही बारकावे तपासावे लागतात. अनेकदा तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते. माठाची खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासाव्या-

नवीन माठ खरेदी करताना घ्यायची काळजी

  • मातीची भांडी ही अधिक टणक होण्यासाठी ती भट्टीमध्ये भाजली जातात. कच्च मातीचं भांड लवकर फुटण्याची किंवा त्याला भेग जाण्याची शक्यता असते. यामुळे माठ खरेदी करताना ते पूर्णपणे भाजलं गेलंय, म्हणजेच तयार आहे याची खातर जमा करून घ्या. 

  • माठ खरेदी करताना ते पूर्णपणे निरखून घ्या. त्यावर एखादी बारीक भेग तर नाही ना हे तपासा. यासाठी तुम्ही बोटाने मटका वाडवून पाहू शकता. बोटाने मटका वाजवून तो टणक आणि भेगाळलेला नाही हे लक्षात येतं.

  • तसचं माठाचं बूड तपासणंही तितकचं गरजेचं आहे. जरी तुम्ही माठ सॅण्डवर ठेवणार असाल तरी माठाचं बूड योग्य गोलाकार असणं गरजेचं आहे. 

  • अलिकडे बाजारामध्ये नळ बसवलेले अनेक माठ येतात. मात्र या माठातून नळाच्या जवळून पाणी गळ्याची शक्यता जास्त असते. यासाठी कायम साधा माठ घेणचं जास्त फायदेशीर ठरतं.

  • याचसोबत बाजारामध्ये नक्षीकाम केलेले फॅन्सी माठही उपलब्ध असतात. मात्र नक्षीकामामुळे या माठामध्ये कुठे दोष तर नाही ना हे तपासणंही कठीण होतं. म्हणूनच साध्या माठाची निवड करावी. 

  • माठ खरेदी करताना ते बाहेरुन जास्त चमकणारं चकचकीत नसावं यासाठी पॉलिशचा वापर केला जातो. असे माठ आरोग्यासाठी योग्य नसतात. 

  • माठ खरेदी करताना ते झाकण्यासाठी मातीचच झाकण घेणं जास्त फायदेशीर ठरतं. माठावर मातीचं झाकणं ठेवल्यास पाणी जास्त गार राहण्यास मदत होते. 

  • माठ सिरॅमिकचा घेऊ नये. मातीच्या माठात पाणी जास्त गार राहतं.

अशा प्रकारे माठ घेताना ते नीट तपासून घेतल्यास तुमची फसवणूक होणार नाही. तसचं योग्य माठातील गार पाणी प्यायल्याने आरोग्याला फायदे होतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने