निरोगी आरोग्यासाठी करा स्वयंपाक घरात मातीच्या हंडी, तवा, ग्लासची एन्ट्री

 मातीच्या भांड्यात जेवण शिजवल्याने आजार दूर राहतात. ही गोष्ट आता आधुनिक विज्ञानाने देखील मान्य केली आहे. त्यामुळेच स्टील, पितळ आणि अॅल्युमिनियमच्या भांड्यांचे चलन असतानाही मातीच्या भांड्यांचे क्रेझ कायम आहे. उन्हाळ्यात माठ आणि सुरईची मागणी वाढलेली आहे. शहरातील अनेक भागात माठांसह मातीच्या विविध प्रकारच्या भांड्यांनी बाजार सजले आहेत.

मातीच्या भांड्यात जेवण केल्याने अनेक प्रकारचे आजार बरे होतात. आयुर्वेदानुसार जर भोजन पौष्टिक आणि स्वादिष्ट बनवायचे असेल तर ते हळु-हळू शिजवले पाहिजे. मातीच्या भांड्यात जेवण तयार होण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो, परंतु आरोग्याला त्यापासून पूर्ण लाभ होतो. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी मातीची भांडी सर्वांत जास्त उपयुक्त आहेत. मातीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने शंभर टक्के पोषण तत्त्वे मिळतात. मातीच्या भांड्यात जेवले तर त्याचा वेगळा स्वाद देखील मिळत असल्याने मातीच्या भांड्यांची मागणी वाढू लागली आहे. यावरूनच आजही लोकांचे मातीबद्दलचे आकर्षण संपलेले नाही. मातीची भांडी, माठ, सुरई, बाटल्या, ग्लास, तवा आणि इतर भांडी वापरत असल्याचे सर्वसामान्यपणे दिसून येते.



जुन्या आठवणीला उजाळा

मातीची भांडी आपल्याला जुन्या काळाची आठवण करून देतात. पूर्वी प्रत्येक घरात फक्त मातीची भांडी वापरली जात होती. अन्न शिजविण्यासाठी, ठेवण्यासाठी आणि गरम करण्यासाठी हंडी आणि कुकर देखील बाजारात उपलब्ध आहेत. आज ही मातीची भांडी घराघरात तसेच उच्चभ्रू रेस्टॉरंट्स आणि पार्ट्यांमध्ये आकर्षणाचे केंद्र झाले आहेत. रणजित सिंग फतेही म्हणाले, आजकाल सर्व प्रकारची भांडी तयार करण्यात येत आहे. ही भांडी लोकांना आकर्षित करीत असताना आरोग्यासाठीही उत्तम आहेत. मातीच्या भांड्यांची मागणी वर्षभर राहते. आज लोक हंडीत फक्त मांसाहारच नाही तर सर्व प्रकारचे पदार्थ तयार करण्यावर भर देतात. 

पदार्थ होताच लज्जतदार

मातीची भांडी स्वच्छ राहतात आणि स्वच्छतेची समस्या देखील नाही. मातीपासून बनवलेले असल्याने या भांड्यांमध्ये ठेवलेल्या अन्नालाही चव आणि गोडवा येतो. लोकांना मातीची भांडी खूप आवडू लागली आहेत. पूर्वी लहान लहान गावात मातीची भांडी वापरली जायची. या भांड्यांचा आरोग्यास फायदा होत असल्याने आता उच्चभ्रू लोकही मातीची भांडी घेऊ लागले आहेत. 

वस्तूंचे दर

माठ, सुरई ः १५० ते ३५० रुपये

हांडी ः २०० ते ५०० रुपये

तवा - १५० ते ३५० रुपये

पाण्याची बाटली - ३०० ते ४५० रुपये

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने