लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या भावात मोठी तेजी; चांदीमध्येही वाढ, जाणून घ्या आजचा भाव

भारत : आज, 15 मे 2023 रोजी जागतिक ट्रेंडमध्ये सोन्या-चांदीचे भाव भारतीय सराफा बाजारात वाढले आहेत. 10 ग्रॅम सोने 61,480 रुपयांवर आले आहे. एक किलो चांदीचा भाव 73,220 रुपये आहे.

अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्याही ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या भावात वाढ दिसून येत आहे.




बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 55,944 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,030 प्रति 10 ग्रॅम आहे.

पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 55,944 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,030 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 55,944 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,030 रुपये इतका असेल.

त्यामुळे तुम्हाला आज म्हणजेच सोमवारी सोन्या-चांदीचे दागिने घ्यायचे असतील तर आज ज्वेलर्सच्या दुकानात हा भाव राहील. 

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने