मुस्लिम समाजाची अल्पवयीन मुले पोलिसांनी ताब्यात घेतली; बालसंकुलात रवानगी

कोल्हापूर : पश्चिम बंगालहून आलेली सुमारे ६९ मुस्लिम समाजाची अल्पवयीन मुले आज संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यांना बालसंकुल मध्ये ठेवण्यात येणार आहे. तर या मुलांकडून मिळणारी माहिती ही संशयास्पद असल्याने त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बुधवारी केली आहे.


येथील रुईकर कॉलनी मध्ये आठ ते पंधरा वयोगटातील काही मुले टमटम मधून आली होती. त्यांची संख्या पाहून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी संशय आला. त्यांनी मुलांकडे चौकशी केली असता बिहार मधील असल्याचे सांगितले. पण त्यांच्याकडे हावडा (पश्चिम बंगाल) ते पुणे अशी रेल्वे प्रवासाची तिकीट सापडली. पुणे येथून ही मुले रेल्वेने कोल्हापुरात आली होती. त्यांच्याकडून मिळणारी माहिती संशयास्पद वाटल्याने कार्यकर्त्यांनी पोलिसांना तेथे बोलावले. पोलिसांनी या मुलांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, मुस्लिम समाजातील आठ ते पंधरा वयोगटातील मुले आज हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना आढळली. त्यांनी माहिती दिल्यानंतर या मुलांकडे प्राथमिक चौकशी केली असता ते आजरा येथे शिक्षणासाठी जात असल्याचे समजले. तेथील संचालकांकडे चौकशी केली असता हि मुले सुट्टी संपवून त्यांच्याकडे येत असल्याची माहिती दिली. या मुलांचे पालक कोण, त्यांच्याकडे आधार कार्ड वगैरे आहे का याबाबतची चौकशी चाइल्ड वेल्फेअरच्या माध्यमातून केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने