शुक्रवारी दिसणार वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण

मुंबई – यंदा १५ दिवसांच्या अंतराने दुसरे ग्रहण होत आहे. यापूर्वी २० एप्रिलला सूर्यग्रहण होते आणि आता येत्या वैशाख पौर्णिमेला म्हणजेच शुक्रवार ५ मे रोजी चंद्रग्रहण होत आहे. मात्र यावेळी चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेतून जाणार असल्याने हे छायाकल्प म्हणजेच मांद्य चंद्रग्रहण असेल, अशी माहिती प्रसिद्ध पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ.सोमण यांनी दिली आहे.



सोमण यांनी सांगितले की, हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. मात्र ते छायाकल्प असल्याने धार्मिक नियम पाळण्याची आवश्यकता नाही. कारण या ग्रहणावेळी चंद्र नेहमीसारखा गडद, लालबुंद दिसत नाही. तो फिकट, विरळ स्वरूपाचा दिसतो. हे ग्रहण इतर चंद्र ग्रहणासारखे नसते. हे ग्रहण ५ मे रोजी रात्री ८.४४ वाजल्यापासून सुरू होईल. रात्री १०.५३ वाजता विरळ छायेत आलेला चंद्र हा जास्तीतजास्त विरळ छायेत येईल. स्थितीला ग्रहण मध्य असे म्हटले जाते. तसेच उत्तररात्री १.२ वाजता हा चंद्र विरळ छायेतून बाहेर पडेल. म्हणजेच हे ग्रहण सुटेल. हे छायाकल्प ग्रहण संपूर्ण आशिया,आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आदी देशातून दिसेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने