Mouth Freshener Benefits: माऊथ फ्रेशनर म्हणून खाणारी वाचवते डायरेक्ट कॅन्सर आणि हार्ट अटॅक पासून

कोल्हापूर : बडीशेप कोणाला आवडत नाही? अनेक लोकांना जेवणानंतर बडीशेप खायची सवय असते. आपण अनेकदा हॉटेलमध्ये गेलो की बिल केल्यावर वेटर आपल्याला बडीशेप आणून देतो आपणही ती खातो. पण खरंतर हीच बडीशेप आपण रोज खालली पाहिजे.

या बडीशेपेकडे जरी फक्त मुखवास म्हणून बघत असला तरी ही फक्त मुखवास नाही. खरंतर खूप आयुर्वेदिक आणि उपयुक्त गोष्ट आहे. बडीशेप खाल्ल्याने अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते. म्हणूनच पूर्वीच्या काळी घरातले मोठे लोकं रोज जेवण झाल्यावर बडीशेप खायचे.

बडीशेपमध्ये अनेक गुणधर्म आहेत, जे पचनानंतर रक्तात विरघळतात आणि विविध गोष्टी करतात. विविध संशोधनानुसार बडीशेप हृदयविकाराचा अटॅक आणि कॅन्सर सारख्या घातक आजारांपासून बचाव करु शकते. चला त्याबद्दल आणखीन जाणून घेऊया.


बडीशेप हृदयासाठी फायदेशीर आहे

बडीशेपमध्ये फायबर असते, जे अनेक संशोधनांमध्ये हृदयासाठी फायदेशीर आढळले आहे. पबमेड सेंट्रल वरील संशोधनानुसार, हाय फायबर डायटमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

अनेक प्रकारच्या कॅन्सरपासून संरक्षण करते

बडीशेप मध्ये ऍनेथोल हे मेन कंटेन आहे, ज्यामध्ये कॅन्सर विरोधी गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले आहे. टेस्ट ट्यूब अभ्यासात, हे कंपाऊंड ब्रेस्टच्या कॅन्सरच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करण्यासाठी उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे बडीशेप ही कॅन्सरपासून बचावासाठी महत्त्वाची मानली जाते.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरु शकते

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही जेवणात बडीशेप वापरु शकता. कारण, बडीशेप ही भूक शमवण्याचे काम करते. ज्याच्या मदतीने तुम्ही कॅलरीजचे प्रमाण नियंत्रित करु शकता. तुम्ही बडीशेप चहामध्ये देखील टाकू शकता.

अनेक पोषक घटक उपलब्ध आहेत

बडीशेपेच्या आत फायबर आणि प्लांट कंपाउंड नसतात. त्या सोडल्या तर इतर आवश्यक व्हिटॅमीन आणि मिनरल्स देखील आढळतात. व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज इत्यादी त्याच्या वापराने मिळू शकतात.

हाय बीपी कमी करते

हाय बीपीचा त्रास असलेल्या लोकांसाठी बडीशेप एक फायदेशीर घरगुती उपाय ठरु शकते. बडीशेपमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसह अनेक आवश्यक घटक आढळतात, जे वाढलेले बीपी कमी करण्यास मदत करतात.

सूज कमी करते

बडीशेपमध्ये कोलीन नावाचे एक अतिशय महत्वाचे पोषक तत्व असते, जे बर्याच काळापासून होत असलेली सूज आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करते. ज्यांना त्वचा किंवा सांध्यांमध्ये जळजळ होण्याची समस्या आहे. त्यांच्यासाठी बडीशेप खाणे खूप फायदेशीर ठरू शकते.

हाडे मजबूत करतो

बडीशेपमध्ये असलेले व्हिटॅमीन आणि मिनलर्स हाडे तयार करण्यास आणि त्यांना ताकद देण्यास मदत करतात. बडीशेपमध्ये असलेले पोटॅशियम हाडांच्या संरचनेचे काम करते. हाडांमध्ये असलेल्या व्हिटॅमिन के मुळे हाडे तुटण्याचा धोका कमी होतो.

पचन क्रिया सुधारतो

बडीशेप मध्ये आढळणारे विशेष फायबर बद्धकोष्ठता सारख्या समस्या कमी करते, जे पचनसंस्थेला सामान्यपणे कार्य करण्यास मदत करते. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन बी 6 देखील आढळते, जे कार्बोहायड्रेट्सचे ग्लुकोजमध्ये आणि प्रथिने अमीनो ऍसिडमध्ये मोडून शरीराला ऊर्जा आणि शक्ती प्रदान करते.

डोळ्यांच्या संबंधित आजार कमी करतो

डोळ्यांशी संबंधित छोट्या-छोट्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी, बडीशेप एक प्रभावी उपाय ठरु शकते. डोळ्यात जळजळ होणे, खाज येणे, असं काही होत असल्यास, बडीशेपची वाफ डोळ्यांवर घेतल्याने यावर आराम मिळतो.

हे फायदेही लक्षात ठेवा

1. बॅक्टेरियाच्या संसर्गापासून संरक्षण

2. जळजळ होण्यापासून संरक्षण करा

3. मानसिक आरोग्यासाठी उत्तम

4. मेनोपॉजच्या लक्षणांपासून आराम

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने