रत्नागिरीत जमावबंदी आदेश मात्र पर्यटनावर निर्बंध नाहीत

रत्नागिरी : राजापूर तालुक्‍यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात २४ एप्रिलपासून ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी इतर भागातून कोणी येऊ नये यासाठी पोलिसांनी येथे जमावबंदी आदेश लागू केला आहे. मात्र येथे पर्यटनावर निर्बंध घातलेले नाहीत, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केला आहे.





बारसू परिसरात रिफायनरी प्रकल्पाच्या दृष्टीने माती परीक्षणासाठी ड्रिलिंगचे काम सध्या चालू आहे. या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी गेल्या २४ एप्रिलपासून आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे पोलिसांनी बारसूसह आजूबाजूच्या आठ गावांमध्ये संचारबंदी, तर अन्य ठिकाणी जमावबंदी आदेश लागू केला आहे. अर्थात त्याचाही मुख्य उद्देश आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अन्य भागातून येऊ पाहणाऱ्या समर्थकांना रोखणे हा आहे. मात्र बाहेरच्या जिल्ह्यातून येणारे प्रवासी किंवा पर्यटकांना रोखलेले नाही, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने