शेअर बाजारात इंट्राडे ट्रेडिंग करताना लक्षात ठेवा हे बारकावे, अन्यथा कष्टाची कमाई गमावून बसाल

मुंबई : बहुतेक लोक मोठा नफा कमावण्याच्या उद्देशाने शेअर बाजारात पैसा गुंतवतात. या क्षेत्रातील तज्ज्ञ लोक नवीन गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देतात, पण शक्य तितक्या लवकर पैसे कमविण्याच्या प्रक्रियेत, बहुतेक गुंतवणूकदार पैसे गमावून बसतात. इंट्राडे ट्रेडिंग हा मार्केटमध्ये पैसे कमविण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. परंतु अनुभवी गुंतवणूकदार - ज्यांना शेअर बाजारातील सर्व बारकावे समजतात किंवा ज्यांची जोखीम घेण्याची आणि तोटा सहन करण्याची क्षमता आहे, तेच या पद्धतीत यशस्वी होतात.

एंजेल वन, स्टॉक मार्केट ब्रोकरच्या मते, इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान ९५ टक्के गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागतो. चला तर मग जाणून घेऊया, इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय आणि त्यात किती जोखीम असते आणि किरकोळ गुंतवणूकदारांना त्यापासून दूर राहण्याचा सल्ला का दिला जातो? या लेखात आम्ही हे देखील समजून घेणार आहोत की ट्रेडिंग करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत अशा शेवटच्या बारकावे काय आहेत.




इंट्राडे ट्रेडिंग आणि दीर्घ काळ गुंतवणूकीत फरक काय?
इंट्राडे ट्रेंडिंग आणि दीर्घ काळ गुंतवणुकीत फरक आहे. जेथे तुम्ही तुमचे भांडवल दीर्घ मुदतीसाठी गुंतवता आणि त्या ठेवींवर काही परतावा मिळवता. ही गुंतवणूक अनेक वर्षे कायम राहते परंतु इंट्राडे ट्रेडिंगमध्ये सर्व काही एका दिवसात होते. काही मिनिटांत किंवा काही तासांच्या खेळात तुम्ही मोठा नफा कमावता किंवा मोठे नुकसान करता. तज्ज्ञांच्या मते इंट्राडे ट्रेडिंग आणि दीर्घकालीन गुंतवणूक या दोन्ही वेगवेगळ्या कमाईच्या पद्धती आहेत. इंट्राडे ट्रेडर्स शेअर्सच्या चढ उतारादरम्यान नफा कमावतात. तर दीर्घकालीन गुंतवणूकदार मजबूत फंडामेंटल्स असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून कालांतराने नफा कमावतात.

९५% गुंतवणूकदारांना इंट्राडेमध्ये तोटा?

शेअर बाजारात सुमारे ९०-९५% गुंतवणूकदारांचे इंट्राडेमध्ये नुकसान होते. याची काही कारणे तज्ज्ञांनी सांगितली आहेत.

  • बहुतेक गुंतवणूकदारांना बाजाराच्या वर्तनामागील कारणे समजत नाहीत.

  • गुंतवणूकदारांमध्ये जोखीम व्यवस्थापनाचा अभाव असतो. 'कट लॉस' आणि 'बुक-प्रॉफिट' या पद्धतींतील बारकाव्यांबद्दल बहुतेकांना माहिती नसते.

  • व्यापारात व्यवहाराची किंमत खूप जास्त ठेवणे.

  • इंट्राडे ट्रेडिंग सेटिमेंट, अफवा आणि ऐकिव माहितीवर विश्ववास ठेवण्याची मानसिकता

  • शेअर बाजारातील ट्रेडिंग हा भावनिक व्यवसाय आहे. यामध्ये लोकांच्या निर्णयावर भावनेचे वर्चस्व असते. ज्यामुळे अनेकदा तोटा होतो. याशिवाय योग्य माहिती नसणे आणि नियमांचे पालन न करणे आणि ओव्हर ट्रेडिंगमुळे नुकसान होते.

किरकोळ गुंतवणूकदारांनी या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
ज्या गुंतवणूकदारांना इंट्राडे ट्रेडिंगमध्ये यशस्वी व्हायचे आहे त्यांनी जोखीम व्यवस्थापन, मार्केट रिसर्च, अचूक ट्रेडिंग धोरण, भांडवली व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. याशिवाय स्टॉप-लॉस ऑर्डर देणे, संशोधन करणे, योजना बनवणे, भावनेवर आधारित व्यापार न करणे यामुळेही धोका कमी होतो. असे न केल्यास एक वाईट ट्रेड देखील एका झटक्यात कष्टाने कमावलेला पैसा नष्ट करू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने