उन्हाचा फटका; कोल्हापुरात हजारावर कोंबड्यांचा मृत्यू

कोल्हापूर : वातावरणातील तापमानाचा पारा वर सरकू लागल्याने नागरिक हैराण झाले असताना दुसरीकडे यामुळे पक्षांनाही फटका बसू लागला आहे. राधानगरी तालुक्यात उष्माघातामुळे हजाराहून अधिक कोंबड्या मृत्युमुखी पडल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. बेरोजगारीवर मात करण्यासाठी स्वयंरोजगार सुरू केला असताना कोंबड्या मरू लागल्याने व्यावसायिकांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
उन्हाचा पारा चढू लागल्याने लोक हैराण झाले आहेत. पशुधनावरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. कुक्कुटपालन व्यवसायावर त्याचे विपरीत परिणाम दिसू लागले आहेत. आकनुर (ता. राधानगरी) येथे सेवानिवृत्त परिवहन कर्मचारी रंगराव पाटील व त्यांचा मुलगा अमर पाटील यांनी पाच वर्षांपूर्वी ५ हजार मांसल कोंबड्यांचा कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे.

पाच लाखाचा फटका

आज दुपारी त्यातील हजाराहून अधिक कोंबड्या दगावल्या. कंत्राट कंपनी असलेल्या याराना पोल्ट्री कंपनीला याची माहिती दिल्यावर त्यांच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. उष्माघाताने कोंबड्या दगावल्या असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे पाटील कुटुंबियांना पाच लाख रुपये यांचे नुकसान सहन करावे लागले आहे. खड्डा जेसीबीने चर खोदून त्यामध्ये दगावलेल्या कोंबड्या दफन करण्यात आल्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने