अदानी समूहाने ODI World Cup 2023 साठी सुरु केली ‘जीतेंगे हम’ मोहीम, कोण-कोण होते सहभागी?

अदानी दिनानिमित्त, १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजयाच्या संघाच्या सहकार्याने अदानी ग्रुपने ‘जीतेंगे हम’ ही मोहीम सुरू केली आहे. जे टीम इंडियाला २०२३ च्या आयसीसी वनडे विश्वचषकासाठी आपला पाठिंबा दर्शवते. भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त, अदानी समूहाने आगामी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियासाठी विजयी भावना जागृत करण्यासाठी काम केले आहे.

अध्यक्ष गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखाली, या मोहिमेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. १९८३ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाच्या दिग्गज आणि चाहत्यांकडून जबरदस्त पाठिंबा मिळत आहे. तसेच ही मोहीम भारतीय क्रिकेट चाहत्यांना एकत्र येण्यासाठी आणि टीम इंडियाला ट्विटर आणि इंस्टाग्रामवर ‘हॅशटॅग जीतेंगे हम’सह पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित करेल, त्यांचे मनोबल वाढवेल.


यावेळी बोलताना अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले, “आपल्या देशातील क्रिकेट हे एक आकर्षण म्हणून काम करते आणि आपल्या भावनांना उधाण आणते. दिग्गज कधीच जन्माला येत नसून ते त्यांच्या लवचिकतेने आणि चिकाटीने तयार होतात. टीम इंडियामध्ये हे दोन्ही गुण असले पाहिजेत, ज्यामुळे आपण १९८३ मध्ये विश्वचषक जिंकला. आमच्या दिग्गजांसह सामील व्हा आणि इतिहासाची पुनरावृत्ती होताना पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला ‘हॅशटॅग जीतेंगे हम’च्या माध्यमातून विश्वचषकासाठी शुभेच्छा द्या.”

माजी कर्णधार कपिल देव काय म्हणाले –

क्रिकेटचे दिग्गज आणि १९८३ च्या विजेत्या संघाचे कर्णधार, कपिल देव म्हणाले, “विश्वचषक २०२३ साठी टीम इंडियाला एकत्र करण्यासाठी अदानी समूहासोबत भागीदारी केल्याचा आम्हाला सन्मान आहे. ही मोहीम तो उत्साह आणि अदम्य भावनेचे प्रतिबिंबित करते, ज्याने आम्हाला १९८३ मध्ये विजय मिळवून दिला. विश्वचषक २०२३ च्या विश्वचषकाच्या तयारीसाठी, संघाने सामूहिक मानसिकता जोपासणे अत्यावश्यक आहे, जे सर्वोत्कृष्ट देण्यास मनापासून वचनबद्ध असावे. यशाचे खरे माप केवळ निकालात नाही, तर वैयक्तिक उत्कृष्टतेच्या अथक प्रयत्नांप्रती अटळ समर्पणात दडलेले असते.”

बीसीसीआयचे अक्ष्यक्ष रॉजर बिन्नी काय म्हणाले?

बीसीसीआयचे अक्ष्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले, “निश्चय आणि सांघिक भावनेने १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असणे, हा एक अविश्वसनीय प्रवास होता. प्रतिष्ठेची ट्रॉफी परत आणण्यासाठी आपल्या सध्याच्या खेळाडूंच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त दाखवू. चला चाहते म्हणून एकत्र येऊ आणि त्यांना इतिहास रचण्यासाठी प्रेरित करूया!”

१९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघासोबत अदानी डे साजरा केला –

अहमदाबादमध्ये शनिवारी अदानी दिन साजरा करण्यासाठी १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. या सोहळ्याला आणखी खास बनवत, ऐतिहासिक संघाचे कर्णधार कपिल देव यांनी गौतम अदानी यांना १९८३ च्या संघाने स्वाक्षरी केलेली खास बॅटही दिली. ही मौल्यवान भेट बहुप्रतिक्षित विश्वचषक २०२३ च्या आधी भारतीय संघाला सादर केले जाणारे प्रेरणादायी प्रतीक म्हणून काम करेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने