भारताला इंटरकॉन्टिनेंटल चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद

कर्णधार सुनील छेत्री आणि लिल्लजुआला छांगते यांनी झळकावलेल्या गोलच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात लेबननला २-० असे नमवत इंटरकॉन्टिनेंटल चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांच्या आक्रमणाला फारशी धार नव्हती. त्यामुळे मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरी होती. यानंतर ४६व्या मिनिटाला छेत्रीने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. हा त्याचा ८७वा आंतरराष्ट्रीय गोल ठरला. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या सक्रिय खेळाडूंमध्ये तो तिसऱ्या स्थानी आहे. या गोलसाठी साहाय्य (असिस्ट) करणाऱ्या छांगतेने ६६व्या मिनिटाला गोल झळकावत भारताची आघाडी दुप्पट केली.



बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या नाओरेम सिंहने छेत्रीच्या पासवर गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लेबननच्या गोलरक्षकाने त्याचा प्रयत्न हाणून पाडला. परंतु, भारताने अखेपर्यंत आघाडी राखताना विजय नोंदवला. जागतिक क्रमवारीत १०१व्या स्थानी असलेल्या भारताने दुसऱ्यांदा स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने