टाटाच करणार कमाल! आयपीओमुळे मोठा फायदा होणार, गुंतवणूकदारांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : देशांतर्गत आयपीओ बाजाराला यावर्षी अद्यापही साजेसा प्रतिसाद मिळालेला नाही. मागील पाच महिन्यात फक्त पाच IPO लाँच झाले, पण आता आगामी काळात हा ट्रेंड करण्याची शक्यता आहे. वर्षाच्या उर्वरित महिन्यांत टाटा, रिलायन्स आणि TVS सारख्या मोठ्या कंपन्या IPO आणण्यासाठी रांगेत आहेत. टाटा समूहाकडून आगामी काळात दोन आयपीओ लाँच केले जातील.



टाटा समूहाचा IPO

या वर्षी आतापर्यंत फक्त सहा कंपन्या IPO बाजारात घेऊन आल्या असून यापैकी एक नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट रिट इश्यू होता. अशा प्रकारे दर महिन्याला सरासरी फक्त एकच IPO येत आहे, परंतु आगामी दिवस पाहता ही परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा आहे. देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट हाऊसपैकी एक असलेला टाटा समूह दीर्घ काळानंतर आयपीओ घेऊन येत आहे. टाटा समूहाचा शेवटचा आयपीओ २००४ साली आला होता, जेव्हा TCS बाजारात सूचिबद्ध झाली होती. त्यानंतर आता टाटा प्लेचा आयपीओ येत असून त्याचा आकार ३००० कोटी रुपये इतका असू शकतो.

टाटा टेक्नॉलॉजीजचा IPO

याशिवाय टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओही लवकरच बाजारात येणार आहे. टाटा मोटर्सच्या या उपकंपनीने बाजार नियामक सेबीकडे मसुदा कागदपत्रे सादर केली असून तो मार्केट नियामकच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. टाटा टेक्नॉलॉजीजच्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स म्हणजेच DRHP नुसार कंपनीचा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल असेल. या आयपीओमध्ये टाटा मोटर्स, अल्फा TC होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड-I सारखे विद्यमान भागधारक त्यांचा हिस्सा कमी करतील.

टाटा टेक्नॉलॉजीस IPO चा GMP

टाटांच्या आयपीओला अद्याप सेबीची मंजुरी मिळाली नसली तरी गुंतवणूकदारांमध्ये याबाबत उत्सुकता स्पष्ट दिसत आहे. आत्तापासून आयपीओला ग्रे मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. द मिंटच्या अहवालानुसार सध्या टाटा टेक्नॉलॉजीज आयपीओची GMP सुमारे ८० ते ८२ रुपये आहे. म्हणजे टाटा टेक्नॉलॉजीजचा स्टॉक मूळ किंमतीपेक्षा रु. ८०-८२ वर सूचीबद्ध होऊ शकतो. मात्र, कंपनीने अद्याप या IPO साठी इश्यू किंमत जाहीर केलेली नाही.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने