बिपरजॉय गुजरातेत धडकणार; जवान, प्रशासन संकटाशी दोन हात करण्यास सज्ज

अरबी समुद्रातील बिपरजॉय हे चक्रीवादळ वेगाने भारतीय किनारपट्टीच्या दिशेने सरकत असून आज हे गुजरातेतील कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदराला येऊन धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जवान, अग्निशामक दलाचे जवान, एनडीआरएफ आणि प्रशासन सज्ज झाले आहे. भारतीय लष्कराने व्हिडिओ शेअर करत या संकटाला सामोरे जाण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचं सांगितलं आहे.




बिपरजॉय चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर सरकारने गुजरातेतील काही भागात आणि महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात रेड अलर्ट जारी केला असून अनेक नागरिकांचे स्थलांतर केले आहे. तर या चक्रीवादळाचे धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या वादळामुळे मोठे नुसकान होण्याची भिती आहे.

त्याचबरोबर केंद्र सरकार आणि राज्यांनी मिळून गेल्या 9 वर्षामध्ये अनेक आपत्तींना तोंड दिले आहे. या नवीन आपत्तीला तोंड देण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हंटलं आहे. 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे होणारे संभाव्य नुकसान कमी करणे हे आमचे उद्दिष्ट आहे असं शाह म्हणाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने