पैसा नसल्याने शिक्षण थांबतंय? सरकार देतंय या 5 स्कॉलरशीप, जाणून घ्या सविस्तर

मुल हुशार आहे, अंतिम परीक्षेत गुणही उत्तम आहेत. पण पैसा नाही म्हणून उच्च शिक्षण घेता येत नाही? अशी जर तुमची अडचण असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुमच्या प्रगतीच्या आड पैसा येऊ नये म्हणून आता सरकारनेच सोय करून ठेवली आहे.

भारत सरकारच्या काही शिष्यवृत्तींच्या सहाय्याने उच्च शिक्षण पुर्ण करणे शक्य होणार आहे. या शिष्यवृत्तीचा फायदा समाजातले गरीब व गरजू विद्यार्थी घेऊ शकतात. जाणून घेऊया सविस्तर.




पंतप्रधान संशोधन फेलोशिप

पंतप्रधान रिसर्च फेलोशिपद्वारा तुम्हाला संशोधन क्षेत्रात उच्च शिक्षण घेता येऊ शकते. तुम्हाला विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात पीएचडी करायची असेल तर पीएमआरएफ मदत करेल. ही फेलोशिप मंत्रालयाकडून मिळेल. यामागे तांत्रिक संशोधनाला चालना देण्याचा उद्देश आहे.

नॅशनल मीन्स कम मेरीट स्कॉलरशिप

ही योजना केंद्र सरकार प्रायोजित आहे. गरीब मुलांसाठी योजना आहे. या अंतर्गत सरकार दरवर्षी १ लाख विद्यार्थ्यांना नॅशनल मीन्स-कम-मेरीट स्कॉलरशिप देते.

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

या योजनेचा उद्देश मध्यप्रदेश राज्यातील मागासवर्गिय विद्यार्थ्यांना, भारतातील प्रीमॅट्रिक स्तराच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे. यात ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असलेल्या विद्यार्थ्यांनाच या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे.

एकल मुलगी शिष्यवृत्ती

आपल्या देशातील मुलींना शिक्षणाद्वारे सक्षम करण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधी सिंगल गर्ल स्कॉलरशिप सुरू करण्यात आली आहे. ६० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण झालेल्या मुलींना एकल बालिका शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळतो.

शिष्यवृत्ती प्रेरित

ज्या विद्यार्थ्याने ग्रॅज्युएशनमध्ये प्रवेश घेतला आहे किंवा गणित, स्टॅटेस्टिक्स, फिजिक्स आदीच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश हवा असेल त्याच विद्यार्थ्याला ही शिष्यवृत्ती दिली जाते. या लोकांना प्रकल्पासाठी वार्षिक ६० हजार रुपये रोख आणि २० हजार रुपये मिळतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने