सर्वांना हवाहवासा शेअर आता लाखमोलाचा, गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ?

 मुंबई : देशात टायर बनवणारी सर्वात मोठी कंपनी मद्रास टायर फॅक्टरी म्हणजे MRF चा शेअर अक्षरशः सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. मंगळवारी कंपनीच्या शेअर्सनी विक्रमी उसळी घेतली आणि एका शेअरचा भाव १,००,००० रुपयांच्या पुढे पोहोचला. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात प्रथमच कंपनीच्या शेअर्सचा भाव लाखांच्या वर गेला असून मार्केट तज्ज्ञांनुसार येत्या काही दिवसात कंपनीचे शेअर्स आणखी मुसंडी मारण्याची शक्यता आहे.




MRF शेअरच्या किमतींचा Outlook

दीर्घ कालावधीत कंपनीचं शेअर्सची किंमत १,५०,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते. तर नजीकच्या काळात १.१५ हजार रुपयांपर्यंत आणि दिवाळीपर्यंत १.२५ लाखांपर्यंत किंमत वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारच्या सुरुवातीच्या सत्रात BSE वर एमआरएफचा शेअर १.३७ टक्क्यांनी चढून प्रति शेअर १,००,३०० रुपयांच्या नवीन ५२ आठवड्यांच्या नवीन उच्चांकावर झेपावला. परंतु ८ मे रोजी MRF शेअर्सनी फ्युचर्स मार्केटमध्ये मानसिकदृष्ट्या महत्त्वाची पातळी ओलांडली.

MRF शेअरमध्ये गुंतवणुकीची योग्य वेळ?

तज्ज्ञांनुसार कंपनीचा स्टॉक सध्या खूप उच्च मूल्यांकनावर असून तो महागडा स्टॉक आहे. त्यामुळे आता काही दिवस वाट पाहणे योग्य ठरेल. दुसरीकडे, ज्यांच्याकडे हे शेअर्स आहेत ते नफा बुकिंग करू शकतात. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार स्टॉकमध्ये फक्त एक खरेदी, दोन होल्ड आणि आठ विक्री सल्ला देण्यात आले आहेत. तसलेच स्टॉकवर १२ महिन्यांची लक्ष्य किंमत ८४,०४७ रुपये देण्यात आली आहे, जी सध्याच्या पातळीपेक्षा १६% घसरण दर्शवत आहे.

एमआरएफ शेअर्सच्या तेजीचे कारण

तयार कंपनीच्या शेअरमधील तेजीने प्रमुख कारण त्याचे व्हॉल्युम आहे. तज्ज्ञांनुसार एमआरएफ स्टॉकमध्ये सातत्याने वाढ होत असून कंपनीने आतापर्यंत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. अशा स्थितीत या शेअरवर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला असून चांगल्या खरेदीमुळे स्टॉकमध्येही तेजी आली आहे.

भारतातील सर्वात महागडे शेअर्स

देशांतर्गत बाजारातील सर्वात महागड्या स्टॉक्सच्या यादीत MRF शेअर आघाडीवर आहे. हनीवेल ऑटोमेशन, ज्या कंपनीचे शेअर काल ४१,१५२ रुपयांवर व्यवहार करत होते, या यादीत दुसऱ्या स्थानावर असून त्यानंतर पेज इंडस्ट्रीज, श्री सिमेंट, 3M इंडिया, ॲबॉट इंडिया, नेस्ले आणि बॉश यांचा क्रमांक लागतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने