शिर्डीत गुरू पौर्णिमेचा उत्सव जल्लोषात; आज अन् उद्या असे असणार कार्यक्रमाचे नियोजन

शिर्डी : आज गुरू पौर्णिमा. आषाढी पौर्णिमेच्या दिवशी गुरू पौर्णिमा साजरी करण्यात येते. शिर्दीच्या साई मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहाने गुरू पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. श्री साईबाबा संस्थानाकडून याचे आयोजन करण्यात येते. यंदा 2 जुलै 2023 पासून गुरुपौर्णिमा उत्सवाला प्रारंभ होत आहे. तर मंगळवार, 4 जुलै 2023 रोजी गुरूपौर्णिमा उत्सव समाप्ती आहे.
गुरू पौर्णिमेच्या दिवशी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात गर्दी करतात. असंख्य भाविक यावेळी शिर्दीतील मंदिरात साई बाबांचे दर्शन घ्यायला येतात. या काळात शिर्डीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तेव्हा या तीन दिवसीय कार्यक्रमाचे यंदाचे स्वरूप कसे असणार ते जाणून घेऊयात.



सोमवार ३ जुलै

पहाटे 5.15 वाजता श्रींची काकड आरती

पहाटे 5.45 वाजता अखंड पारायण समाप्ती, श्रींच्या फोटोची आणि पोथीची मिरवणूक

सकाळी 6.20 वाजता श्रींचे मंगलस्नान आणि दर्शन

सकाळी 7 वाजता श्रींची पाद्यपुजा

दुपारी 12.30 वाजता श्रींची माध्यान्ह आरती

सायंकाळी 4 ते 6 या वेळेत कीर्तन कार्यक्रम

सायंकाळी 7 वाजता श्रींची धुपारती

सायंकाळी 7.30 ते रात्री 9 आणि रात्री 9.30 ते रात्री 10 यावेळेत भजन संध्याचा कार्यक्रम

रात्री 9.15 वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार

हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार

या दिवशी श्रींची शेजारती आणि 4 जुलै रोजीची पहाटेचे श्रींची काकड आरती होणार नाही

या दिवशी रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साईभजन होईल.

मंगळवार, 4 जुलै 2023

उत्सवाच्या सांगता दिनी मंगळवार, 4 जुलै रोजी पहाटे 5.05 वाजता श्रींचे मंगलस्नान आणि दर्शन

सकाळी 6.50 वाजता श्रींची पाद्यपुजा

सकाळी 7 वाजता गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार

सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत गोपालकाला कीर्तन आणि दहिहंडीचा कार्यक्रम होणार

दुपारी 12.10 च्या दरम्यान श्रींची माध्यान्ह आरती होणार

सायंकाळी 7 वाजता श्रींची धुपारती होईल

रात्री 7.30 ते 9.30 यावेळेत भजन संध्याचा कार्यक्रम

रात्री 10 वाजता श्रींची शेजारती होईल

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने