पगारदार म्हणून तुम्हाला किती मोजावा लागणार टॅक्स, तुमचा नेमका टॅक्स स्लॅब कोणता? जाणून घ्या

नवी दिल्ली : इन्कम टॅक्स भरणाऱ्या करणदात्यांसाठी आता शेवटचे काउंटडाउन सुरू झाले आहे. यावेळीही आयकर रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे, त्यामुळे जर तुम्ही कर कक्षेत येत असाल तर तुमच्याकडे आता टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक आहेत. अशा स्थितीत आयकर रिटर्न भरण्याची घाई करा कारण नंतर तुम्हाला दंड भरून हे काम करावे लागेल.




अंतिम मुदत संपल्यानंतर प्राप्तिकर विभाग करदात्यांना विलंबित ITR दाखल करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत वेळ देतो ज्यासाठी करदात्यांना किमान पाच हजार रुपये दंड भरावा लागेल. परंतु तुम्हाला तुमच्या उत्पन्नावर किती कर भरावा लागेल हे माहित नसेल तर तुम्ही ते देखील आयकर पोर्टलवरून सहज जाणून घेऊ शकता. कसं ते आम्ही तुम्हाला सांगतो. टॅक्स कॅल्क्युलेटर आयकर पोर्टलवर लाइव्ह आहे जेणेकरून लोकांना किती उत्पन्नावर किती कर भरावा लागतो हे सहज कळू शकेल.

कराची गणना कशी करायची?

कर मोजण्यासाठी प्रथम तुम्ही प्राप्तिकर पोर्टल वेबसाइट ई-पोर्टलवर जा आणि तुमच्या आधार किंवा पॅन कार्ड प्रविष्ट करून लॉगिन करा. आता तुमचे आयकर पोर्टल प्रोफाइल तुमच्या समोर उघडेल. यानंतर, तुम्हाला खाली डाव्या बाजूला काही पर्याय दिसतील. त्याच वेळी, एक आयकर कॅल्क्युलेटर देखील आहे. त्यावर क्लिक करून कंटिन्यू करा. आता तुमचे उत्पन्न प्रविष्ट करा आणि त्याची गणना करू द्या. चुटकीसरशी कराचा एकूण हिशोब तुमच्या कमाईनुसार तुमच्यासमोर येईल.

टॅक्स स्लॅब बदलले

१ एप्रिल २०२३ पासून सुरू झालेल्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन आयकर प्रणालीला डीफॉल्ट कर प्रणाली म्हणून घोषित केले. तथापि नागरिकांसाठी जुन्या कर प्रणालीचा पर्यायही खुला असेल. अर्थमंत्र्यांच्या घोषणेनुसार जर तुम्ही नवीन कर प्रणालीनुसार कर रिटर्न दाखल केले तर तुम्हाला ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने