दुपारी केलेली ही 5 कामे देतात 100 वर्षापर्यंत दीर्घ व ठणठणीत आयुष्य, सायंटिस्टची सोपी ट्रिक

प्रत्येकालाच दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगायचे असते. पण यासाठी काय करायला हवे अनेकांना माहिती नसते. साहजिकच आयुष्य उत्तम ठेवण्यासाठी आहार आणि शारीरिक हालचालींचा मोठा वाटा आहे. अनेक लोक निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी सहसा सकाळी आणि झोपण्याच्या वेळेची विशेष काळजी घेतात. असे मानले जाते की, सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी निरोगी सवयींचे पालन केल्याने शरीर ठणठणीत राहण्यास मदत होते.

अर्थात ते खरे आहे पण तुमची दुपार नेमकी कशी घालवायची याचेही एक शस्त्र आहे. दुपारच्या वेळीही काही आरोग्यदायी सवयींचे पालन केल्यास दीर्घायुष्य लाभण्यास मदत होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. अर्थात, दुपारच्या वेळी तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असता पण कामाच्या दरम्यान काही चांगल्या सवयी अंगीकारल्याने तुमचे शरीर तंदुरुस्त राहते चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या सवयी. आजपासूनच करायला घ्या आणि वयाच्या 100 री पर्यंत राहा 20 शीतल्या तरूणांसारखे फिट..! 



काम करा रिझल्टचं टेन्शन घेऊ नका

दुपारी जेव्हा तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी असता तेव्हा कामावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असतेच पण सोबतच स्वतःची देखील काळजी घेणे महत्त्वाचे असते. कधी कधी काम जास्त असू शकते पण तुम्ही ते पूर्ण करण्याचा विचार करा पण त्याचे टेन्शन घेऊ नका. टेन्शनमुळे आयुष्य कमी होते, मग तुम्ही घरी असा किंवा कामावर. काही गडबड झाल्यास विनाकारण काळजी करू नका आणि काम अर्धवट सोडू नका. मोठी कामे लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला आनंद आणि समाधान मिळू शकते.

एकत्र लंच करा

काही लोक एकटे बसून, घाई घाईत किंवा त्यांच्या डेस्कवर एकट्याने खाणे पसंत करतात. त्यांच्या मनात फक्त कामाचा विचार असतो. पण लंच ब्रेक हा एक ब्रेक म्हणूनच वापरायला हवा यावेळी. सहकाऱ्यांसोबत जेवण करा. या दरम्यान कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींबद्दल बोला. दुपारचे जेवण एकत्र आणि योग्य वेळी केल्याने कनेक्शनची भावना निर्माण होते, ज्यामुळे तुम्हाला फ्रेश होण्यास मदत होते.

चालण्यासाठी वेळ काढा

दिवसभर बसून राहिल्याने अनेक गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. कामातून वेळ काढून जिममध्ये जा, फिरायला जा किंवा कामाच्या ठिकाणी कोणत्याही खेळात किंवा शारीरिक हालचालींमध्ये भाग घ्या. जर खूप बीझी असाल तर किमान वेळ काढून वॉक करायला तरी जा.

थोडे सोशलाइज व्हा

दीर्घायुष्य जगण्यासाठी सोशलाइज होणे आवश्यक आहे. मनुष्य हा नैसर्गिकरित्या एक सोशलाइज प्राणी आहे, म्हणून आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आपल्याला इतर लोकांशी कनेक्टेड राहणे आवश्यक आहे. तुमच्या सहकार्‍यांसोबत दुपारचे जेवण करा, कॉफी ब्रेक घ्या किंवा दुपारी तुमच्या आईला किंवा मैत्रिणीला कॉल करा. ही छोटीशी कृतीही तुम्हाला सोशलाइज राहण्यास मदत करते.

दुपारी छोटीशी डुलकी घ्या

दुपारी सगळ्यांनाकज झोप येते. पण अशावेळी एक डुलकीही तुम्हाला फ्रेश करण्यासाठी पुरेशी आहे. संशोधकांचा असा विश्वास आहे की कामाच्या दरम्यान थोडीशी झोप घेतल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. दुपारी 15-30 मिनिटे वेळ मिळेल तशी झोप घ्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने