कोंड्यापासून ते केसगळतीपर्यंत सर्व समस्या ‘या’ तेलामुळे होतील दूर, जाणून घ्या घरच्या घरी कसे तयार करायचे तेल

कित्येक खाद्यपदार्थांमध्ये कांद्याचा वेगवेगळ्या पद्धतीने समावेश केला जाते. पण कांद्याचे फायदे केवळ आरोग्यापुरते मर्यादित नाहीत. कांद्यापासून केसांकरिता तेलही तयार करता येते, यामुळे केसांना खोलवर पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. केसगळती, कोंडा, कोरडे केस यासारख्या केसांशी संबंधित समस्या कांद्याच्या तेलामुळे दूर होतात. 

हे एक आयुर्वेदिक तेल आहे, ज्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि एंझाइम्स हे गुणधर्म असतात; जे केसांच्या आरोग्यासाठी पोषक आहेत. कांद्याच्या तेलामुळे टाळूची त्वचा देखील निरोगी राहते व महत्त्वाचे म्हणजे केसांची चांगली वाढ होते. 




घरी कसे तयार करावे कांद्याचे तेल ?

  • कांद्याचे तेल तयार करण्यासाठी 200 मिलीलिटर नारळाचे तेल, अर्धा कापलेला कांदा आणि एक कप कढीपत्ता ही सामग्री आवश्यक आहे.  

  • सर्वप्रथम कांदा बारीक चिरून घ्यावा. यानंतर कांदा व कढीपत्ता एकत्रित मिक्सरमध्ये वाटून घ्या. 

  • गॅसच्या मंद आचेवर एक छोटेसे भांडे ठेवा आणि त्यामध्ये नारळाचे तेल गरम करत ठेवा.

  • तेल थोडेसे गरम झाल्यानंतर त्यामध्ये वाटलेला कांदा आणि कढीपत्त्याची पेस्ट मिक्स करा व तेल उकळू द्यावे.  

  • पाच ते 10 मिनिटे तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करावा. 

  • कांद्याचे तेल तयार झाले आहे. तेल थंड करत ठेवा.

  • तेल थंड झाल्यानंतर एका काचेच्या बाटलीमध्ये गाळून तेल भरावे. 

  • आठवड्यातून दोन ते तीन वेळा या तेलाने हेडमसाज करावा.

  • कमीत कमी एक ते दीड तास तेल केसांना लावून ठेवा.

  • यानंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावेत. 

कांद्याचे तेल केसांना लावण्याचे फायदे 

  • कांद्यामध्ये एंझाइम्सचे गुणधर्म असतात, ज्यामुळे केसांची चांगली वाढ होण्यास मदत मिळते. 

  • कांद्याच्या तेलामुळे नवीन केस येण्यासही मदत मिळते. 

  • पातळ केस आणि कमकुवत केसांची समस्याही दूर होण्यास मदत मिळते. 

  • टाळूच्या त्वचेवर होणारे बॅक्टेरिअल इंफेक्शन दूर होण्यासही कांद्याचा तेल फायदेशीर ठरते. 

  • कांद्याचे तेल टाळूच्या त्वचेचे पीएच लेवल संतुलित ठेवण्यास फायदेशीर ठरते.

  • केसांना नैसर्गिक स्वरूपात कंडिशनर मिळते, ज्यामुळे केस मऊ राहतात. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने