मध्य रेल्वेच्या ९ ते २३ ऑगस्टदरम्यान वेगवेगळ्या तारखांना १९ गाड्या रद्द; वाचा कारण काय ते….

अकोला : मुंबई-हावडा मध्य रेल्वेच्या चौथ्या मार्गाला सक्ती रेल्वे स्थानकाशी जोडण्याचा आणि या स्थानकाच्या ‘यार्ड रिमॉडेलिंग’चे काम करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. हे पूर्ण करण्यासाठी गाड्यांचे संचालन थांबवावे लागणार आहे. ९ ते २३ ऑगस्टपर्यंत वेगवेगळ्या तारखांना १९ गाड्या रद्द राहतील. रेल्वेने प्रभावित गाड्यांसंबंधी माहिती प्रसिद्ध केली आहे. यामुळे मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

हावडा-मुंबई मुख्य मार्गावर सक्ती रेल्वेस्थानक आहे. नागपूर ते बिलासपूर आणि येथून झारसुगुडा या मार्गावर चौथा मार्ग टाकण्यात येत आहे. यातील काही विभागांमध्ये चौथ्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गासोबतच त्यामध्ये गाड्यांची वाहतूकही सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत सक्ती रेल्वेस्थानकाचे पुनर्निर्माण आणि या स्थानकाशी चौथी मार्गिका जोडण्याची तयारी सुरू आहे.




हे काम पूर्ण करण्यासाठी १० ते २२ ऑगस्ट दरम्यान सक्ती स्थानकावर ‘नॉन इंटरलॉकिंग’चे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे ९ ते २३ ऑगस्टपर्यंत गाड्यांवर परिणाम होणार आहे. काही गाड्या १३ दिवस धावणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मात्र, प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने १० ते २२ ऑगस्ट दरम्यान सक्ती रेल्वे स्थानकाऐवजी जेठा पॅसेंजर हॉल्टवर गाड्या थांबविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

अकोला मार्गे धावणाऱ्या या रद्द गाड्या

१४ ऑगस्ट १२८८० भुवनेश्वर – कुर्ला एक्सप्रेस. (बडनेरा थांबा नाही)

१६ ऑगस्ट १२८७९ कुर्ला भुवनेश्वर – एक्सप्रेस. (बडनेरा थांबा नाही)

१२ ऑगस्ट २०८२२ संत्रागाछी – पुणे एक्सप्रेस. (अकोला, बडनेरा थांबा नाही)

१४ ऑगस्ट २०८२१ पुणे-संत्रागाछी एक्सप्रेस. (अकोला, बडनेरा थांबा नाही)

या गाड्या रद्द

१० ते २२ ऑगस्ट ०८७३८ बिलासपूर – रायगड मेमू पॅसेंजर स्पेशल

१० ते २२ ऑगस्ट ०८७३७ रायगड-बिलासपूर मेमू पॅसेंजर स्पेशल.

०९ ते २२ ऑगस्ट ०८७३६ बिलासपूर – रायगड मेमू पॅसेंजर स्पेशल.

१० ते २३ ऑगस्ट ०८७३५ रायगड – बिलासपूर मेमू पॅसेंजर स्पेशल.

०९ ते २१ ऑगस्ट १८११३ टाटानगर – बिलासपूर एक्सप्रेस.

१० ते २२ ऑगस्ट १८११४ बिलासपूर-टाटानगर एक्सप्रेस.

०९ ते २१ ऑगस्ट १८१०९ टाटानगर – इतवारी एक्सप्रेस.

०९ ते २१ ऑगस्ट १८११० इतवारी – टाटानगर – एक्सप्रेस.

०९ ऑगस्ट २०८२८  संत्रागाछी-जबलपूर एक्सप्रेस.

१० ऑगस्ट २०८२७ जबलपूर-संत्रागाछी एक्सप्रेस.

१० ऑगस्ट १७००५ हैदराबाद-रक्सौल एक्सप्रेस.

१३ ऑगस्ट १७००६ रक्सौल-हैदराबाद एक्सप्रेस.

११ ऑगस्ट २२८४३ बिलासपूर-पाटणा एक्सप्रेस.

१३ ऑगस्ट २२८४४ पाटणा-बिलासपूर एक्सप्रेस.

१० ते २२ ऑगस्ट ०८८६१/०८८६२ गोंदिया – झारसुगुडा मेमू पॅसेंजर स्पेशल बिलासपूर आणि झारसुगुडा दरम्यान.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने