शिवरायांचं 'ते' ऐतिहासिक वाघनखं आता प्रत्यक्ष पहायला मिळणार; युकेकडून होणार भारताकडं सुपूर्द

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध ज्या वाघनखांनी केला ती ब्रिटनमधून भारतात परत आणण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून केली जात आहे. ही वाघनखं परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटनमधील अधिकाऱ्यांनी ती परत देण्यास मंजूरी दिली आहे. शिवरायांची वाघनखं परत आणण्यासाठी राज्य सरकार लवकरच एक करार करणार आहे.

ही वाघनखं सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरीया अँड अल्बर्ट या संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. शिवरायांनी वापरलेली ही वाघनखं परत करण्याबाबत ब्रिटनच्या आधिकाऱ्यांनी होकार कळवला असून हा करार पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतीक कार्यमंत्री महिनाअखेर लंडनला जाणार आहेत. या करारानंतर ही वाघनखं या वर्षाअखेर भारतात परत येऊ शकतात.



आम्हाला ब्रिटनच्या अधिकाऱ्यांकडून पत्र मिळाले आहे की त्यांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नाखे परत देण्याचे मान्य केले आहे. हिंदू कॅलेंडरनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारले त्या दिवसाच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला ते परत मिळू शकतील. इतर काही तारखांचाही विचार केला जात असून वाघनखं परत नेण्याच्या पद्धतही ठरवण्यात येत आहेत, असेही मुनगंटीवार म्हणाले.

सामंजस्य करारावक स्वाक्षरी करण्याव्यतिरिक्त, आम्ही शिवरायांची जगदंबा तलवार यांसारख्या इतर वस्तू देखील पाहणार आहोत ज्या यूकेमध्ये प्रदर्शनात ठेवली आहे आणि त्या परत आणण्यासाठी पावले उचलू. वाघनखे परतीच्या मार्गावर आहेत ही बाब महाराष्ट्रासाठी आणि जनतेसाठी एक मोठे पाऊल आहे. अफझलखानच्या वधाची तारीख ग्रेगोरियन कॅलेंडरवर आधारित 10 नोव्हेंबर आहे परंतु आम्ही हिंदू तिथी कॅलेंडरनुसार तारखा ठरवत आहोत, मुनगंटीवार म्हणाले. टाइम् ऑफ इंडियाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघनखे हा इतिहासाचा अनमोल ठेवा असून त्यांच्याशी राज्यातील जनतेच्या भावना निगडीत आहेत. त्यांचं हस्तांतरण वैयक्तिक जबाबदारी आणि काळजीपूर्वक केले पाहिजे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

यासाठी मुनगंटीवार आणि या खात्याचे मुख्य सचिव (डॉ. विकास खारगे) तसेच राज्याच्या पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे हे लंडनमधील व्ही अँड ए आणि इतर संग्रहालयांना भेट देतील, असे सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केलेल्या सरकारी पत्रकात सांगण्यात आले आहे. यानुसार, 29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालवधीत होणाऱ्या तीन सदस्यीय टीमच्या सहा दिवसीय दौऱ्यासाठी सुमारे 50 लाख रुपये खर्च येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने