व्हॉट्सअ‍ॅप-इन्स्टावर मिळणार नवीन एआय टूल्स, ChatGPT सारखाच चॅटबॉटही होणार उपलब्ध; मेटाची घोषणा!

मेटा कनेक्ट 2023 हा मेटाचा वार्षिक इव्हेंट सध्या सुरू आहे. 27 आणि 28 सप्टेंबर असा दोन दिवस हा इव्हेंट असणार आहे. यावर्षीच्या इव्हेंटमध्ये मेटाने एआयवर अधिक फोकस केला आहे. कंपनीने यावेळी आपल्या नव्या एआय असिस्टंटची देखील घोषणा केली.




Meta AI

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी या इव्हेंटमध्ये Meta AI ची घोषणा केली. हा एआय असिस्टंट अगदी चॅटजीपीटी प्रमाणेच असणार आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्सअ‍ॅप याठिकाणी हा एआय चॅटबॉट उपलब्ध असेल.

हे एआय टूल सध्या केवळ टेक्स्ट कमांड्सना सपोर्ट करतं, मात्र भविष्यात यात आणखी अपडेट येण्याची शक्यता असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं. मेटा एआय हे सध्या केवळ अमेरिकेत उपलब्ध आहे. इतर देशांमध्ये ते कधी येईल याबाबत कंपनीने स्पष्टीकरण दिलं नाही.

व्हॉट्सअ‍ॅपवर एआय स्टिकर्स

व्हॉट्सअ‍ॅपवर आता यूजर्सना एआयच्या मदतीने नवीन स्टिकर्स तयार करता येणार आहेत. यूजर्स केवळ काही शब्द टाईप करून, त्यांना कशा प्रकारचं स्टिकर हवं आहे हे सांगू शकतील. एआय टूल हे स्वतःच तसं स्टिकर तयार करुन देईल.

इन्स्टाग्रामवर फोटो एडिटिंग

इन्स्टाग्रामवर देखील नवीन एआय टूलचा विशेष वापर करता येणार आहे. एखाद्या फोटोमध्ये तुम्हाला काय एडिट करु हवं आहे किंवा कसा बदल हवा आहे, हे तुम्ही केवळ टाईप करून या एआय टूलला सांगू शकता. त्यानुसार ते यूजर्सना फोटो एडिट करून देईल.

स्मार्ट डिव्हाईस लाँच

यासोबतच, Meta Connect कार्यक्रमात कंपनीने नवीन व्हीआर हेडसेट क्वेस्ट 3 आणि रेबॅन स्मार्ट ग्लासेस देखील लाँच केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने