सद्गुरूंनी सांगितले बदाम चुकीच्या पद्धतीने खाणे दारूपेक्षाही ठरते शरीरासाठी हानिकारक, होऊ शकतो कॅन्सर

बदाम हे नियमित खाण्याने बुद्धी तल्लख होते आणि आरोग्याला याचा फायदा होतो हेच आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मात्र प्रसिद्ध सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बदाम हे चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास दारूपेक्षाही भयानक ठरतात आणि यामध्ये कॅन्सर निर्माण करणारी तत्व असतात असंही त्यांनी सांगितले आहे.

त्यामुळे बदाम खाताना ते कशा पद्धतीने खावे आणि किती खावे हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. बदामातून आपल्या शरीराला योग्य ताकद मिळावी यासाठी कोणत्या पद्धतीने किती आणि कधी बदाम खावे हे जाणून घ्यायला हवे. या लेखातून सद्गुरूंनी दिलेल्या माहितीप्रमाणे आम्ही अधिक विस्तारितपणे तुम्हाला सांगत आहोत. तुम्हीही वेळीच सावध व्हा आणि या लेखातून माहिती मिळवा.




बदाम नेहमी भिजवून खावे

बदाम खाताना नेहमी रात्री पाण्यात भिजवून मगच खावे. भिजलेले बदाम खाल्ल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते आणि तुमची त्वचादेखील तजेलदार आणि चमकदार राहाते. तसंच भिजवून बदाम खाल्ल्याने त्यातील उष्णता कमी होते आणि शरीराला त्रास होत नाही. बदामातील योग्य पोषक तत्व शरीराला मिळू शकतात.

केमिकल निघून जाते

बदाम भिजवून खाण्याचा हा फायदा असतो की, त्याच्या सालांवरील कार्सिनोजेनिक केमिकल्स निघून जातात. हे केमिकल्स शरीरामध्ये कॅन्सर निर्माण करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे सालांवरील हे केमिकल्स निघून गेल्यानंतर बदाम खाणे हे शरीरासाठी फायदेशीर ठरते असे सद्गुरूंनी सांगितले आहे.

कोलेस्ट्रॉल करते कमी

बदामामध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन असून वजन कमी करणे, बुद्धी तल्लख करणे, स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी आणि शरीरामध्ये उर्जा राखून ठेवण्यासाठी याचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. याशिवाय शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बदामाचा उपयोग होतो आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. मात्र भिजलेल्या बदामामधूनच तुम्हाला हे सर्व पोषक तत्व मिळतील असंही सद्गुरू यांनी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

शरीरासाठी उपयुक्त घटक

बदामामध्ये फायबर, प्रोटीन, ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड्ससारखे उपयुक्त घटक आढळतात, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. त्यामुळेच लहानपणापासून मुलांना दिवसातून किमान २ भिजवलेले बदाम खायला द्यावेत असं सांगण्यात येते आणि अनेक घरांमध्ये हे फॉलोदेखील करण्यात येते.

बदाम कसे ठरते यकृतासाठी हानिकारक

NCBI ने केलेल्या अभ्यासानुसार, बदाम अथवा अन्य ड्रायफ्रूट्समध्ये अफलाटॉक्सिन B1 नावाचा घटक आढळतो. हा यकृताच्या कर्करोगासाठी हानिकारक ठरतो असं सांगण्यात येते. या केमिकलमुळे लिव्हरच्या कॅन्सरला धोका वाढण्याची शक्यता अभ्यासात सांगण्यात आली आहे आणि त्यामुळेच बदाम नेहमी भिजवून खावे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने