खजिन्याचा नकाशा सापडला! ४००० वर्ष जुन्या नकाशाचं रहस्य सोडवण्यात गुंतले पुरातत्वशास्त्रज्ञ

पुरातत्वशास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञांनी ४००० वर्ष जुन्या प्राचीन दगडी नकाशाचे गूढ उकलल्याचा दावा केला आहे. कांस्ययुगीन नकाशा पहिल्या दृष्टीक्षेपात रहस्यमय चिन्हे कोरलेल्या खडकाचा फक्त एक तुकडा असल्याचं दिसून येतं. परंतु हे सेंट-बेलेक स्लॅब पुरातत्वशास्त्रज्ञांना वायव्य फ्रान्समधील हरवलेली स्मारके आणि खजिन्यापर्यंत घेऊन जाऊ शकते, फ्रेंच वृत्तसंस्था एजन्सी फ्रान्स-प्रेसने याबद्दलचं वृत्त दिले आहे.

@Paracelsus1092 नावाच्या ट्विटर पेजवर यासंबंधीची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली असून हा कुठल्या खजिन्याचा नकाशाही असू शकतो, असे सांगण्यात आले आहे. हा दगडी नकाशा महत्त्वाचा आहे. कारण, आम्ही प्रथमच त्यातील कार्टोग्राफिक सामग्री प्रकट करू शकलो आहोत, असं CNRS संशोधन संस्थेचे क्लेमेंट निकोलस, ज्यांनी या प्रकल्पावर काम केले त्यांनी न्यूजवीकला सांगितले.




यामध्ये ओडेट व्हॅलीचे आणि नद्याचे, खासकरुन ऑल्ने नदीच्या वळणदार भागांची अचूक 3D चित्रणची तुलना नेटवर्क विश्लेषणाद्वारे आधुनिक काळातील नकाशांसह करण्यात आली आहे. सामान्यतः पुरातत्वशास्त्रज्ञ शोध लावण्यासाठी रडार उपकरणे आणि हवाई फोटोग्राफीसारख्या गोष्टींचा वापर करतात. प्राचीन नकाशांवरही हे तितकेच प्रभावी ठरू शकते.

युरोपचा सर्वात जुना नकाशा

२०२१ मध्ये सेंट-बेलेक स्लॅबला युरोपचा सर्वात जुना नकाशा म्हणून घोषित करण्यात आलं होतं आणि तेव्हापासून, पुरातत्वशास्त्रज्ञ शोध घेण्याच्या आशेने त्याच्या खुणा उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. एएफपीच्या वृत्तानुसार, १९०० मध्ये पहिल्यांदा याचा शोध लागला होता, परंतु ज्या इतिहासकाराने याचा शोध लावला त्यांना त्याचे महत्त्व समजले नाही.

नकाशात दाखवलेले क्षेत्रफळ किती मोठे आहे?

त्यानंतर २०१४ मध्ये, वेस्टर्न ब्रिटनी विद्यापीठाचे प्राध्यापक यव्हान पॅलर आणि निकोलस यांनी ही कलाकृती पुन्हा शोधून काढली आणि ती एका संग्रहालयात ठेवली. इकडे पॅलरने त्याच्या खुणा जवळून बघायला सुरुवात केली. पॅलर यांनी एएफपीला सांगितले, काही लहान चिन्हे होती जी लगेच समजण्यासारखी होती. संशोधकांनी आतापर्यंत नकाशावरील क्षेत्र सुमारे १८ मैल बाय १३ मैल असल्याचे निश्चित केले आहे.

पुरातत्वशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, नकाशामध्ये समाविष्ट केलेले क्षेत्र एकेकाळी प्राचीन साम्राज्य असावे. संपूर्ण क्षेत्राचा अधिक शोध घेण्याआधी त्याचे सर्वेक्षण आणि क्रॉस-रेफरन्स करावे लागतील. हे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे १५ वर्षे लागणार आहेत. या भागात फ्रान्सच्या ब्रिटनी प्रदेशातील रौडौलाक पर्वतांचा समावेश आहे. संशोधकांनी स्लॅबवर ठसा उमटवलेल्या नद्या आणि खडकावरील रेषांच्या रूपातही डीकोड केले आहेत. जेव्हा त्यांनी नकाशाची आधुनिक नकाशाशी तुलना केली, तेव्हा त्यांना आढळले की ते ८० टक्के जुळते.

निकोलस म्हणाले, "या क्षणी, आम्हाला फक्त नैसर्गिक भूदृश्यांचा (नद्या, पर्वत) नकाशा समजतो आहे. आम्हाला या चिन्हांचे मुख्य भाग (ओव्हल, वर्तुळ, चौरस, कपमार्क) डीकोड करणे आवश्यक आहे. चित्रित सेंट-बेलेक नकाशा साइट शोधण्यासाठी वापरला जावा असा विचार केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने