भारतीय खेळाडूंवर आणली या एका गोष्टीसाठी बंदी, नेमकं प्रकरण आहे तरी काय जाणून घ्या...

भारतीय संघाने वर्ल्ड कपमध्ये सलग पाच विजय मिळवले आहेत. आतापर्यंत एकाही संघाला ही कामगिरी करता आलेली नाही. भारतीय संघ सध्याच्या घडीला १० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. पण या पाच विजयांनंतर भारतीय खेळाडूंवर एका गोष्टीसाठी बंदी आणली आहे.

भारतीय संघाने या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या पाच संघांवर विजय मिळवले आहेत. भारताने धरमशाला येथे झालेल्या सामन्यात दमदार विजय मिळवला. भारताचा हा वर्ल्ड कपमधील पाचवा विजय ठरला. या विजयानंतर भारताचे १० गुण झाले आणि त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. पण अव्वल स्थान पटकावल्यावर भारतीय खेळाडूंवर एका गोष्टीसाठी बंदी आणण्यात आली आहे.




भारतीय संघातील खेळाडूंना आता दोन दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे भारताचे खेळाडू धरमशाला येथे दोन दिवस मजा-मस्ती करू शकतात. पण यावेळी भारतीय खेळाडूंवर मात्र यावेळी एका गोष्टीची बंदी घालण्यात आली आहे. धरमशाला हे निसर्गरम्य ठीकाण आहे, हे कोणालाही सांगयला नको. धरमशाला येथे बऱ्याच जागा अशा आहेत की ज्या मनाला भावतात आणि त्या ठिकाणी जाण्याची इच्छा होते. धरमशालाच्या मैदानाच्या मागेच मोठे डोंगर आहेत आणि त्यावर पडणारा बर्फ हा प्रत्येकाला मोहित करत असतो. त्यामुळे भारतीय खेळाडूंनाही तेथे जाण्याचा मोह होऊ शकतो. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने आता खेळाडूंच्या ट्रेकिंगवर बंदी घातली आहे. खेळाडूंसाठी दोन दिवस सुट्टी नक्कीच असेल पण त्यांना कोणत्याही ट्रेकवर जाता येणार नाही. कारण ट्रेकिंग करताना खेळाडूंना दुखापत होऊ शकतो. सध्याच्या घडीला भारतीय संघ भन्नाट फॉर्मात आहे. भारताचे खेळाडूही चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे जर कोणत्याही खेळाडूला यावेळी दुखापत झाली तर ती भारतीय संघाला परवणारी नक्कीच नाही. त्यामुळे भारतीय खेळाडूंना दोन दिवसांची सुट्टी देण्यात आली असली तरी त्यांच्या ट्रेकिंगवर मात्र बंदी घालण्यात आली आहे.

भारताचा आता पुढचा सामना रविवारी २९ ऑक्टोबरलाआहे. हा सामना इंग्लंडबरोबर होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने