र्गेची शक्तिपीठे का निर्माण झाली? ती फक्त भारतातच आहेत का?

नरात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभर पहायला मिळत आहे. देवीची आदिस्थाने असलेल्या ठिकाणी भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. आजवर जेव्हा कधी देवीच्या मंदिरांबद्दल चर्चा होते तेव्हा देवीच्या ५१ शक्तिपीठांबद्दल बोललं जातं. ही ५१ शक्तिपीठे नक्की काय आहेत, कुठे आहेत त्यांची निर्मिती कशी झाली याची आपण माहिती घेऊयात.   

देवीच्या ५१ शक्तिपीठांची कथा

'तंत्र चूडामणी' या ग्रंथामध्ये त्यांच्या उत्पत्तीबद्दल एक लाक्षणिक कथा सांगितली अशी दोन्ही स्वरुपे आहे. सती प्रजापती दक्ष यांची कन्या होय. वडिलांच्या विरोधात जात सतीमातेने भगवान शिवांशी विवाह केला होता. त्यानंतर काही वर्षांनी प्रजापती दक्षने मोठा यज्ञ करण्याचे ठरवले. यासाठी त्याने सर्व देवी-देवतांना आमंत्रणे पाठवली, परंतु भगवान शिवाला नाही. 




देवी सतीला आमंत्रण येणार हे चांगलेच माहीत होते, पण तसे झाले नाही. ती त्या यज्ञाला जायला हताश होती. पण भगवान शिवांनी नकार दिला. यज्ञाला जाण्याचे निमंत्रण मिळालेले नाही त्यामुळे तेथे जाणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. सती राजी झाली नाही आणि यज्ञाला जाण्यासाठी पुन्हा पुन्हा आग्रह करत राहिली. 

शेवटी स्त्री हट्ट पुरवत शिवांनी सतीला तिथे जाण्याची परवानगी दिली. सती जेव्हा तिचे वडील प्रजापीत दक्ष यांच्या घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिले की कोणीही तिच्याशी आदर आणि प्रेमाने बोलत नव्हते. त्यांच्या इतर बहिणींचे कौतुक सुरू होते. पण कोणीही सतीची चौकशी सुद्धा केली नाही. केवळ आईने त्याला प्रेमाने मिठी मारली. 

एवढंच नाहीतर, सतीच्या इतर बहिणींनी सतीच्या संसाराची थट्टा केली. तसेच, सतीचा पती भगवान शिव यांचाही तिरस्कार करत होत्या. खुद्द दक्षनेही त्यांचा अपमान करण्याची संधी सोडली नाही. असे वागणे पाहून सती दुःखी झाल्या. 

तिला स्वतःचा आणि नवऱ्याचा अपमान सहन होत नव्हता. आणि मग पुढच्याच क्षणी तिने एक पाऊल उचलले ज्याची स्वतः दक्षनेही कल्पना केली नसेल. सतीने त्याच यज्ञाच्या अग्नीत स्वत:ला झोकून देऊन आपले प्राण अर्पण केले.

जेव्हा वडिलांनी आयोजित केलेल्या कुंडात सतीने स्वत:ला झोकून दिलं तेव्हा तिच्यावर निस्सिम प्रेम करणारे भगवान शंकर क्रोधित झाले. शंकरांनी यज्ञकुंडातील सतीचे कलेवर उचलून त्रैलोक्यात भ्रमण केले व तांडवनृत्य केले. परंतु भगवान विष्णुंना हे बरे वाटले नाही. त्यांनी सुदर्शन चक्राने त्या कलेवराचे तुकडे ५१ तुकडे केले. ते एक्कावन्न तुकडे सर्व पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी ५१ शक्तिपीठे निर्माण झाली.

तंत्रचूडामणित त्या शक्तिंपीठांचा उल्लेख आहे. परंतु त्यातील काही पीठांचा अद्यापही शोध लागलेला नाही. अशा ५१ शक्तिपीठांपैकी सतीचे नेत्र जिथे पडले ते करवीर! स्कंद पुराणातही करवीर क्षेत्र लक्ष्मीनिर्मित आहे असे म्हटले आहे.

महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपिठे आहेत. कोल्हापुरची अंबामाता, तुळजापूरची आई भवानी, माहूरगडची रेणूका आणि वणीची सप्तश्रृंगी अशी साडेतीन शक्तीपिठे आहेत. आता पाहुयात देवीची एक्कावन्न शक्तिपिठे कुठे आहेत.

  • हिंगुला : बलुचिस्थानमधील लासावलेला येथे हिंगोस नदीच्या काठी  
  • हावडा-बरहरवा लोहमार्गावर खगराघाटाजवळ. किरीट
  • वृन्दावन : मथुरा-वृंदावन मार्गावर.
  • करवीर : कोल्हापूर (महाराष्ट्र).
  • सुगंधा : हल्लीच्या बांगलादेशात शिकारपूर येथे.
  • करतोयातट : बांगलादेशात भवानीपूर गावात.
  • श्रीपर्वत : काश्मिरात पंजिका लडाखजवळ
  • वाराणसी : काशी येथील विशालाक्षी मंदिर
  • गोदातट : राजमहेंद्री (आंध्र).
  • गण्डकी : नेपाळमधील मुक्तिनाथ येथे.
  • शुचि : कन्याकुमारीपासून आठ मैलांवर
  • पंचसागर निश्चित माहिती मिळत नाही.
  • ज्वालामुखी : पंजाबमध्ये ज्वालामुखी रोड स्टेशनपासून १० कि.मी.
  • भैरवपर्वत : उज्जैनजवळ क्षिप्रा नदीच्या काठी.
  • अट्टहास : अहमदपूर-कटवा रेल्वे मार्गावर लाभपूर स्थानकाजवळ,
  • जनस्थान : नाशिक-भद्रकाली
  • काश्मिर : अमरनाथ गुफेत
  • नंदीपूर :  हावडा कयूल मार्गावर नलहाटीजवळ
  • श्रीशैल्य : श्रीशैल पर्वतावर.
  • मिथिला :  जनकपूरपासून ३२ मैलावर नलहाटीजवळ (जनकपूरपासून ३२ मैलावर आहे,याची निश्चित माहिती मिळत नाही.)
  • रत्नावली : मद्रास
  • प्रभास : गिरनार पर्वतावर
  • जालंधर : पंजाब
  • रामगिरी : चित्रकूट.
  • वैद्यनाथ : वैद्यनाथ धाम येथील वैन्यनाथ शिवमंदिरासमोर..
  • वक्तेश्वर : ओंजल सेंथिया लोहमार्गावर.
  • कन्यकाश्रम : कन्याकुमारी
  • बहुला : कटवा (बंगाल) देशात चंद्रशेखर पर्वतावर
  • चट्टल : बांगला देशात चंद्रशेखर पर्वतावर.
  • उज्जयिनी : उज्जैनमधील रुद्रसागरजवळ.
  • मणिवेदक : पुष्कर तीर्थाजवळ गायत्री पर्वतावर.
  • मानस : तिबेटात मानस सरोवरानजीक
  • यशोर : बांगलादेशातील खुलना जिल्ह्यात
  • प्रयाग : निश्चित स्थान समजत नाही.
  • उत्कल : जगन्नाथपुरीतील विमलादेवी, (विरजा) (काहीच्या मते याजपूर येथे)
  • कांची : कांची (मद्रास)
  • कालमाधव: निश्चित माहिती मिळत नाही.
  • शोण : अमरकण्टक (सोन नदीच्या उगमस्थानी)
  • कामगिरी : आसाममधील कामाख्या.
  • नेपाळ : पशुपतिनाथ (नेपाळ) गुह्येश्वरी देवीचे मंदिर...
  • जयंती : आसाममधील जयन्तिया पर्वतावर.
  • मगध : पाटणा (बिहार)
  • त्रिस्तोता : जलपैगुडी जिल्हा (बंगाल)
  • त्रिपुरा : त्रिपुरा राज्यात राधाकिशोरपूर गावाजवळ
  • विभास : बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यात तमलुक गावी.
  • कुरुक्षेत्र : कुरुक्षेत्र- द्वैपायन सरोवराजवळ
  • लंका : प्राचीन लंका, निश्चित स्थान समजत नाही.
  • युगाधा : बरद्वान स्टेशनपासून १६ किलोमीटरवर
  • विराट : जयपूरपासून ३२ किलोमीटवर
  • कालीपीठ : कलकत्त्याची कालीमाता

शक्तिपीठांच्या या दोन गणना असल्या तरी ५१ पीठांची गणना सर्वमान्य असलेली दिसते. त्यात श्रीशैल, जालंदर कांची, कामाक्षी किंवा कामाख्या काश्मीर, काली (कलकत्ता) इत्यादी बारा पीठे आज महत्त्वाची मानली जातात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने