सांध्यातील युरिक अ‍ॅसिड झर्रकन फेकेल शरीराबाहेर हे १ मसाल्यातील पान, असे करा सेवन

बरेचदा आपण पाहतो की काही व्यक्तींना सांधेदुखी, गुडघेदुखी अथवा टाचदुखीची समस्या अत्यंत त्रासदायक ठरते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे वाढलेले प्रमाण. ऑस्टियोआर्थरायटिस अथवा सांधेदुखीसारख्या समस्या हा रक्तातील युरिक अ‍ॅसिडच्या वाढलेल्या प्रमाणामुळे अधिक बळावतात.

वास्तविक युरिक अ‍ॅसिड प्युरिन वाढल्यामुळे होते. प्युरिन हे असे केमिकल घटक आहे, जे आपल्या शरीरात तयार होते. तसंच काही पदार्थांमध्येही प्युरिन आढळते. अतिरिक्त प्युरिन किडनी फिल्टर करू शकत नाही आणि त्यामुळे शरीरातून युरिक अ‍ॅसिड बाहेर फेकले जात नाही आणि मग हे सांध्यांमध्ये जमा होऊन सांधेदुखीचा त्रास निर्माण होतो. मात्र आपल्या किचनमधील असा एक मसाला आहे जो यावर उत्तम ठरतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने दिलेल्या अहवालानुसार तमालपत्र युरिक अ‍ॅसिडवरील रामबाण उपाय ठरते.




तमालपत्राचा करा समावेश

प्युरिन रिच फूड्सचा शोध घेत असाल तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये किचनमधील तमालपत्राचा समावेश करून घ्या. तुमच्या किडनी फंक्शनच्या सुधारणेसाठी तमालपत्र अधिक उपयुक्त ठरते. तसंच शरीरातील प्युरिन आणि हाय युरिक अ‍ॅसिड बाहेर काढून फेकण्यासाठीही याचा उपयोग होतो. किडनीसाठी याचे उत्तम फायदे मिळतात.

तमालपत्रातील गुणधर्म

गाऊट आणि सांधेदुखीच्या रूग्णासाठी तमालपत्र अत्यंत फायदेशीर ठरते. युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात आणण्यासाठी याचा उपयोग होतो. तमालपत्रामध्ये विटामिन ए, सी आणि फॉलिक अ‍ॅसिडसारखे आवश्यक पोषक तत्व असून यामध्ये अँटीऑक्सिडंट्स गुण आढळतात, जे किडनीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात.

प्युरिन बाहेर फेकण्यासाठी उपयुक्त

तमालपत्रामध्ये ड्युरेटिक अर्थात मूत्रवर्धक कामात याचा प्रभाव अधिक होतो. किडनी डिटॉक्स करण्यासाठी आणि किडनीच फिल्टर आरोग्यदायी राखण्यासाठी तमालपत्राचा उपयोग होतो. याशिवाय तमालपत्र हे शरीरातील युरियाचे प्रमाण कमी करून प्युरिन बाहेर फेकण्यासाठी मदत करते आणि युरिक अ‍ॅसिड कमी करण्यास फायदा होतो.

कसे वापरावे तमालपत्र

  • जेवण करताना कडी, भाजी, आमटी अथवा भाताला फोडणी देण्यासाठी तमालपत्राचा वापर करता येतो
  • हर्बल चहामध्ये ३-४ तमालपत्र घालून उकळा आणि मग या चहाचे सेवन करा
  • तमालपत्र घालून पाणी उकळा आणि मग गाळून या पाण्याचे सेवन करा. तुमची युरिक अ‍ॅसिडची समस्या
  • सहज कमी होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने