२००० रुपयांच्या ९७ टक्के नोटा आल्या परत, आरबीआयने दिली माहिती

वितरणातून बाहेर काढण्यात आलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांपैकी ९७ टक्क्यांहून अधिक नोटा बँकिंग व्यवस्थेत परत आल्या आहेत आणि आता लोकांकडे फक्त १० हजार कोटी रुपयांच्या नोटा उरल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बुधवारी ही माहिती दिली.

रिझर्व्ह बँकेने या वर्षी १९ मे रोजी २ हजार रुपयांच्या नोटा वितरणातून बाद करण्याची घोषणा केली होती. लोकांना या नोटा बँकांमध्ये जमा करण्याची आणि इतर मूल्यांच्या नोटांसह बदलण्याची सुविधा देण्यात आली. रिझव्‍‌र्ह बँकेने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, १९ मे २०२३ रोजी व्यवसायाच्या समाप्तीवेळी चलनात असलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य ३.५६ लाख कोटी रुपये होते. आता ते ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी १० हजार कोटी रुपयांवर आले आहे.




आरबीआयच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारे १९ मे २०२३ पर्यंत चलनात असलेल्या २ हजार रुपयांच्या एकूण नोटांपैकी ९७ टक्क्यांहून अधिक नोट आता परत आल्या आहेत. सध्या नोटा आता बँकांमध्ये जमा करता येणार नसल्या तरी रिझर्व्ह बँकेच्या १९ कार्यालयांमध्ये २,००० रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलून घेता येणार आहेत.

दरम्यान, २ हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी आरबीआय कार्यालयात कामकाजाच्या वेळेत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने