हिवाळ्यात तुमचेही पाय वारंवार थंड पडतात का? जाणून घ्या कारण अन् उपाय

अनेकदा हिवाळ्यात गार वाऱ्यामुळे लोकांचे हातपाय थंड राहतात. लोक या हंगामात थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा अवलंब करतात. हात आणि पाय उबदार ठेवण्यासाठी अनेक लोकं मोजे आणि हातमोजे वापरतात. पण काही लोक असे असतात ज्यांचे पाय सतत थंड राहतात.

बऱ्याच लोकांना ही अगदी सामान्य गोष्ट वाटते. पण, उबदार कपडे घातल्यानंतरही तुमचे पाय बर्फासारखे थंड राहिल्यास ते अनेक गंभीर आजारांचे कारण असू शकते.

त्याचबरोबर काही गोष्टी अशा असतात ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत राहता. चला तर मग आज जाणून घेऊया हिवाळ्यात हात-पाय थंड पडण्यामागील कारण काय आणि त्यापासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.




हायपोथायरॉईडीझममुळे हात-पाय थंड पडतात

घशात असलेल्या थायरॉईड ग्रंथीमधून थायरॉईड संप्रेरक स्राव बिघडणे किंवा त्याच्या कमतरतेमुळे शरीरात रक्तप्रवाह मंद होऊ शकतो. जे हात-पाय थंड पडण्यास कारणीभूत ठरतात आहे.

विशेष म्हणजे, थायरॉईड संप्रेरक आपल्या चयापचय आणि हृदय गतीवर देखील परिणाम करतात. त्यामुळे शरीरातील त्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्तप्रवाह मंदावतो आणि त्यामुळे आपले हात-पाय थंड पडतात.

मधुमेहामुळे हात-पाय थंड पडतात

मधुमेह किंवा शुगरवरील औषधांमध्ये काही रसायने असतात जी आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी करतात. साहजिकच, यामुळे रक्ताभिसरण मंदावते आणि आपले हात-पाय थंड राहतात.

याव्यतिरिक्त, शुगरच्या त्रासामध्ये मज्जासंस्थेला नुकसान होण्याचा धोका असतो. ज्या लोकांना याचा त्रास होतो त्यांना हाता-पायाला मुंग्या येणे आणि सर्दी होण्याचा त्रास होतो.

अॅनिमियामुळे हात-पाय थंड पडतात

अॅनिमियाचा शब्दशः अर्थ रक्ताची कमतरता होतो. खरं तर, आपल्या रक्तातील बहुतेक लाल रक्तपेशी आरबीसी असतात. याच्या अभावामुळे अॅनिमिया होतो. लोह आणि फोलेट तसेच व्हिटॅमिन-बी (12) ची कमतरता यासाठी कारणीभूत असू शकते.

याव्यतिरिक्त, मूत्रपिंडाच्या अयोग्य कार्यामुळे अॅनिमिया किंवा रक्त पातळ होण्याची शक्यता असते. अॅनिमिया किंवा रक्त पातळ होण्याचा त्रास होतो त्यांचे हात-पाय बऱ्याचदा थंड पडतात. कारण लाल रक्तपेशीच आपले रक्त प्रवाहा व्यवस्थित ठेवतात.

रक्ताभिसरणाचा वेग मंदावल्यामुळे हात-पाय थंड पडतात

जेव्हा तुमचा रक्तप्रवाह मंद होतो तेव्हा शरीरामध्ये उष्णाता वाढते. हे सतत सुस्तावल्यासारखे बसल्यामुळे देखील होते त्यामुळे मग तुमचे हात-पाय थंड पडतात. यासाठी रोज काही योगासन किंवा व्यायाम करावे. जेणेकरून तुमचा रक्तदाब योग्य राहील आणि तुम्हाला थंडी वाजणार नाही आणि तुमचे हात-पाय थंड पडणार नाही.

हात-पाय थंड पडू नये म्हणून या गोष्टींची घ्या काळजी

हिवाळ्यात हात आणि पाय थंड ठेवण्यासाठी लोकरीचे किंवा उबदार शूज वापरा. नेहमी उबदार कपडे, हातमोजे आणि मोजे घाला. दररोज व्यायाम करत रहा. निकोटीनचा प्रभाव टाळा, कारण या गोष्टी थंड होण्याचा प्रभाव वाढवतात. बसताना व काम करताना मधेच उठून वेगाने चालावे म्हणजे शरीर उबदार राहते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने