महाराष्ट्रातील 'या' भागांमध्ये आजही अवकाळी पावसाचा इशारा; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

चक्रीवादळ मिचॉन्ग तामिळनाडूला सोडून आंध्र किनारपट्टीवर धडकलं आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशातील सात जिल्ह्यांतील 9,454 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. या चक्रीवादळाचा मोठा फटका हा तामिळनाडू राज्याला बसला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मिचॉन्ग चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे

आज चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदियात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. वातावरण देखील ढगाळ राहण्याची शक्यता आहे.




बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'मिचॉन्ग' या तीव्र चक्रीवादळ आज दुपारी दक्षिण आंध्र प्रदेशला धडकले. नेल्लोर ते कावलीदरम्यान बापटला जिल्ह्याजवळ दुपारी साडेबारा ते अडीचदरम्यान चक्रीवादळाने ताशी ९० ते १०० कि.मी. वेगाने आंध्रचा किनारा ओलांडल्याची माहिती हवामान खात्याने दिली. दक्षिण आंत्रव्रातील जिल्ह्यांत चक्रीवादळामुळे मोठी वित्तहानी झाली. त्याचप्रमाणे, पिकांचेही नुकसान झाले.

दरम्यान, पुणे आणि परिसरात पुढील दोन दिवस हवामान अंशतः ढगाळ राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. याशिवाय राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात बुधवारी (ता. ६) आणि गुरुवारी (ता. ७) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली.

बंगालच्या उपसागरातील 'मिचॉन्ग' या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पावसाला अनुकूल वातावरण असल्याने विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परिणामी, राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान २८ ते ३४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. राज्यात महाबळेश्वर येथे मंगळवारी १५.२ अंश सेल्सिअस इतकी नीचांकी तापमानाची नोंद झाली.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने