टाटांच्या शेअरची फुल्ल स्पीड! उम्मीद से जादा परतावा देणारा स्टॉक आणखी तेजीत वाढतोय, पुढे किती फायदा?

आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी बाजारात विक्रीचा सपाटा दिसून आला. टाटा कंपन्यांच्या अनेक शेअर्सने विक्रमी उच्चांक गाठला. असाच एक शेअर टाटा मोटर्सचा आहे. डिसेंबर तिमाही निकाल जाहीर होण्यापूर्वी टाटा मोटर्सचे शेअर्स 5 टक्क्यांनी वाढून ८८६.३० रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले तर, शेअरची किंमत ८५९.२५ रुपयांवर बंद झाली. या शेअर्सबाबत तज्ज्ञांकडूनही तेजीचा कौल देण्यात आला असून ट्रेडिंग दरम्यान टाटा मोटर्सने बाजार भांडवलामध्ये मारुती सुझुकीला मागे टाकले आणि भारतातील सर्वात मौल्यवान कार कंपनी बनली.

टाटा मोटर्सला तब्बल सात वर्षांनंतर हे यश मिळाले असून व्यापाराच्या शेवटी मारुतीचे बाजार भांडवल ३,१३,२४८.७२ कोटी रुपये आणि टाटा मोटर्सचे २,८५,५१५.६४ कोटी रुपये होते. टाटा मोटर्स डिसेंबर तिमाहीचे निकाल २ फेब्रुवारी रोजी जाहीर करणार आहे.




तज्ज्ञांचे मत?

ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिल्लाधर यांनी टाटा मोटर्सचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यानुसार शेअरची किंमत अल्पावधीत ९०० रुपयांची पातळी ओलांडू शकते. ब्रोकरेजने शेअरची शिफारस केली तेव्हा त्याची किंमत ७९१ रुपये होती. याशिवाय मॉर्गन स्टॅनली आणि मोतीलाल ओसवाल यांसारखे ब्रोकरेजही शेअरबाबत उत्साही दिसत आहेत.

शेअर्समधील तेजीचे कारण

जग्वार लँड रोव्हर (JLR) ची विक्रमी विक्री आणि प्रवासी वाहनांच्या किमती वाढल्यामुळे कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली असून मागील एका महिन्यात शेअरने १० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. टाटा मोटर्सने गेल्या आठवड्यात १ फेब्रुवारी २०२४ पासून त्यांच्या प्रवासी वाहनांच्या किमती ०.७% वाढवणार असल्याची घोषणा केली होती ज्यामध्ये कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांचाही समावेश आहे.

टाटा मोटर्सच्या जग्वार लँड रोव्हर विभागाने तिसऱ्या तिमाहीत १.०१ लाख घाऊक युनिट्सची विक्री केली, जी दरवर्षी २७% वाढली आहे. गेल्या ११ तिमाहीतील हा सर्वाधिक घाऊक विक्रीचा आकडा देखील आहे.

एप्रिलपासून हा प्लांट सुरू होईल

टाटा मोटर्स या वर्षी एप्रिलपासून फोर्ड इंडियाकडून विकत घेतलेल्या साणंद प्लांटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू करण्याचा विचार करत आहे. कंपनीच्या युनिट टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडने हा प्लांट गेल्या वर्षी जानेवारीमध्ये फोर्ड इंडियाकडून ७२५.७ कोटी रुपयांना विकत घेतला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने