पाळीव कुत्र्यासोबत ट्रेनमध्ये प्रवास करायचा आहे? मग, त्यापूर्वी IRCTC चे 'हे' नियम घ्या जाणून

आजकाल अनेक जण पाळीव प्राण्यांसोबत फिरायला जातात. मात्र, पाळीव प्राण्यांसोबत जवळच्या ठिकाणांवर फिरायला जाण्यात आणि लांबच्या ठिकाणी फिरायला जाण्यात खूप फरक आहे. यासाठी एखाद्या ट्रीपचे नियोजन करणे, हे अजिबात सोपे काम नाही.

कारण, जवळच्या ठिकाणी जाताना तुम्ही एकवेळ तुमचा पाळीव कुत्रा किंवा मांजरीची खास देखभाल करू शकता. मात्र, लांबच्या ठिकाणी जाताना हे अजिबात शक्य नसते. मग, अशावेळी अनेक जण आपल्या पाळीव कुत्र्याला किंवा मांजरीला कुणाकडे तरी ठेवून जातात.




अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला जर लांबच्या ट्रीपला ट्रेनमध्ये तुमच्या पाळीव कुत्र्याला किंवा मांजरीला सोबत न्यायचे असेल तर, त्यासाठी भारतीय रेल्वेचे काही नियम आहेत. कोणते आहेत हे नियम? ते आज आपण जाणून घेणार आहोत.

पाळीव कुत्र्यासोबत किंवा मांजरीसोबत ट्रेनने प्रवास करण्यापूर्वी 'या' नियमांचे करा पालन :

  • तुम्ही रेल्वेत सेकंड एसी, थर्ड एसी, चेअर कार किंवा स्लीपर क्लासमध्ये पाळीव कुत्रा किंवा मांजरीला घेऊन प्रवास करू शकत नाही. यासाठी तुम्हाला फर्स्ट एसीमध्ये २ बर्थ किंवा ४ बर्थ च्या कूपचे खास बुकिंग करावे लागेल.
  • रेल्वेचे तिकीट एकदा कन्फर्म झाल्यानंतर पाळीव कुत्र्याच्या किंवा मांजराच्या मालकाने संबंधित रेल्वे स्थानकावरील मुख्य रिझर्वेशन अधिकाऱ्याला त्यांच्या पाळीव प्राण्याबद्दल माहिती देणारा अर्ज लिहावा लागेल. हा अर्ज तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करू शकता.
  • प्रवासाला निघण्यापूर्वी तुम्हाला किमान १-२ तास आधीच रेल्वे स्टेशनवर पोहचणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही रेल्वे अधिकाऱ्यांना सर्व महत्वाची कागदपत्रे दाखवू शकाल. जसे की, तुमच्या पाळीव प्राण्याच्या लसीकरणाच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स, कन्फर्म तिकिट, फिटनेस प्रमाणपत्र इत्यादी.
  • एका प्रवाशाच्या नावाने (PNR) वर फक्त एकच पाळीव कुत्रा किंवा मांजरीसोबत प्रवास करण्याची परवानगी आहे. यासाठी तुम्ही आयआरसीटीसीद्वारे ऑनलाईन तिकीट बुक करू शकता.
  • प्रवासाला जाण्यापूर्वी तुम्हाला काही दिवस आधी तुमच्या पाळीव कुत्र्याचे किंवा मांजरीचे लसीकरण करावे लागेल. रेल्वेमध्ये तुम्ही तुमच्यासोबत लसीकरण न केलेला कुत्रा किंवा मांजर नेऊ शकत नाही.
  • महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पाळीव कुत्र्याच्या किंवा मांजरीच्या खाण्यापिण्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. तुमच्या पाळीव कुत्र्याच्या किंवा मांजरीच्या रेल्वे प्रवासासाठी रेल्वे तुमच्याकडून प्रति किलो ६० रूपये आकारते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने