फास्टॅगपासून ते जीएसटी पर्यंत 1 मार्चपासून बदलणार 'हे' नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी पैशाशी संबंधित असे अनेक नियम बदलत असतात ज्यांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होतो. 1 मार्च 2024 पासून अनेक नियम बदलणार आहेत. फास्टॅग ते जीएसटी असे अनेक नियम उद्यापासून बदलणार आहेत. जाणून घेऊया या नियमांबद्दल.

एलपीजी किंमत

एलपीजीच्या किंमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला निश्चित केल्या जातात. तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती निश्चित करतात.

कंपन्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती वाढवतील अशी अपेक्षा आहे. 14.2 किलो घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा दर दिल्लीत 1053 रुपये, मुंबईत 1052.50 रुपये, बेंगळुरूमध्ये 1055.50 रुपये, चेन्नईमध्ये 1068.50 रुपये आहे.




बँकांना 13 दिवस सुट्ट्या

मार्चमध्ये 14 दिवस बँका बंद राहतील. या 14 दिवसांच्या सुट्यांमध्ये सर्व रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार देखील समाविष्ट आहे. म्हणजेच साप्ताहिक सुटी व्यतिरिक्त सणासुदीमुळे आठ दिवस बँका बंद राहणार आहेत.

देशातील सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी 14 दिवस बँका बंद राहणार नाहीत. या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी असतील. ज्या राज्यांमध्ये सुट्ट्या आहेत त्या राज्यांमध्येच बँका बंद राहतील. मार्च महिन्यात शिवरात्री, होळी आणि गुड फ्रायडे असे सण असल्याने बँका बंद राहणार आहेत.

फास्टॅग

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टॅगचे KYC अपडेट करण्याची अंतिम तारीख 29 फेब्रुवारी निश्चित केली आहे. म्हणजेच आजच तुमच्या फास्टॅगचे केवायसी पूर्ण करा. अन्यथा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तुमचा फास्टॅग निष्क्रिय करू शकतात किंवा ब्लॅकलिस्ट करू शकतात.

सोशल मीडियाचे नवीन नियम

सरकारने अलीकडेच आयटी नियमांमध्ये बदल केले आहेत. X, Facebook, YouTube आणि Instagram सारख्या सोशल मीडिया ॲप्सना हे नियम पाळावे लागतील. मार्च महिन्यापासून सोशल मीडियावर चुकीच्या माहितीसह कोणतीही बातमी प्रसारित झाल्यास त्यासाठी दंड आकारला जाऊ शकतो. सोशल मीडिया सुरक्षित ठेवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

जीएसटी नियमांमध्ये बदल

केंद्र सरकारने GST नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. 1 मार्च 2024 पासून GST नियम बदलत आहेत. आता 5 कोटींहून अधिक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना ई-इनव्हॉइसशिवाय ई-बिल तयार करता येणार नाही. शुक्रवारपासून हा नियम लागू होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने