Chocolate Day 2024 : जगातलं सर्वात महाग चॉकलेट किती रूपयाचं माहितीय का?

जगात खूप कमी लोक असतात आहेत ज्यांना चॉकलेट आवडत नसेल. काही लोक तर चॉकलेटचे वेडे असतात. यात फक्त लहान मुलांनाच चॉकलेट आवडत असं नाही तर ते मोठ्यांनाही तेवढच आवडत. पणआपण कुणालाही एक चॉकलेट देऊन खुश करू शकतो.

चॉकलेटची किंमत फार तर फार हजारो रूपयाच्या घरात असेल असा विचार आपण करतो. पण असं नाहीय. आपल्या विचारांच्या दुर दुर पर्यंत चॉकलेटची किंमत पोहोचली आहे. आज चॉकलेट डे आहे. त्यामुळेच आम्ही सर्व चॉकलेट प्रेमींसाठी काही अशी माहिती घेऊन आलो आहोत. जी ऐकून तूम्हीही चक्रावून जाल.




या चॉकलेटचा दर्जा नुसता बघूनच दिसतो. 'ले चॉकलेट बॉक्स' हे देखील खूप महाग चॉकलेट आहे. हा चॉकलेट बॉक्स चांगल्या डिझाइन केलेल्या बॉक्समध्ये येतो. त्यात हिऱ्याचे हार, बांगड्या आणि पन्ना आणि नीलमणी बनवलेल्या अंगठ्या आहेत. त्यातील चॉकलेट त्याच्या सॉफ्ट आणि स्पेशल चवीसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या एका बॉक्सची किंमत सुमारे $1.5 दशलक्ष म्हणजेच 10.94 कोटी रुपये आहे.

जर तुम्ही जगातील सर्वोत्तम आणि अस्सल कोको चॉकलेट शोधत असाल, तर तुमच्यासाठी हा बेस्ट पर्याय असू शकतो. डेन्मार्कमधून आलेले निप्सचिल्ड चॉकोलेटियरचे चॉकलेट ट्रफल परिपूर्ण आहे. याची किंमत $2,600 म्हणजे 1,89,498 इतकी आहे.

फ्रोझन ह्योट या चॉकलेटला बनविण्याकरिता २८ दुर्लभ प्रकारच्या कोको, गोल्ड लीफ आणि La Madeleina Au Truffle वापरण्यात येतो. या चॉकलेटच्या कोपऱ्यांवर गोल्ड आणि डायमंड ब्रेसलेट लावल्या जातात. याची किंमत २५ हजार डॉलरच्या जवळपास आहे.

नोका चॉकलेट हे चॉकलेट एक कॅनडियन कंपनी बनवते. तसेच हे जगातील सर्वात महागडं चॉकलेट असल्याचे फोर्ब्स मॅगझिनमध्ये देखील नोंद झाली होती. या चॉकलेटची किंमत ३३० डॉलर म्हणजे तब्बल २४६०२.२१ रुपये आहे.

डेल्फी एडीबल गोल्ड क्रिएशन हे देखील महागडं चॉकेटल असून एका बॉक्समध्ये ८ चॉकलेट येतात. त्याची किंमत ही ३९७ डॉलर इतकी आहे. या बॉक्समध्ये स्वीस गोल्ड कॉईन देखील असतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने