“आफ्रिकन” आंबा आता रत्नागिरीच्या बाजारातही

कोकणातून नेऊन परदेशात आफ्रिकेत लागवड झालेला ‘ आफ्रिकन ‘ आंबा या हंगामात चक्क ६ महिने आधीच भारताच्या बाजारपेठांमध्ये विक्रीस दाखल झाला आहे. कोकणातील हापूसप्रमाणेच रंग, आकार, चवीचा ‘आफ्रिकन  आंबा आता रत्नागिरीच्या बाजारपेठेत आणि तोही सहा महिने अगोदर दाखल झाल्याने येथील खवय्यांचा नजर आंब्याकडे खिळल्या आहेत. 
हापूस आंबा हा कोकणचे वैभव मानले जाते. अलीकडेच हापूसला जीआय मानाकंही प्राप्त झाले आहे . त्यामुळे हापूसच्या नावाने होणाऱ्या फळाचा काळ्या बाजाराच्या विक्रीला पायबंद होण्यास मदत होईल.असे बोलले होते. पण विशेष म्हणजे रत्नागिरीतून कलम करून आफ्रिकेत लागवड करण्यासाठी नेण्यात आला होता. येथे हापूसची मोट्या प्रमाणात लागवड करण्यात आली. तेथील हवामानही हापूस आंब्याला पोषक असल्याने त्या ठिकाणी तो चांगलाच बहरला जातो आणि कोकणातील हापूसपेक्षा सहा महिने अगोदर तेथील हवामानुसार परिपक्व देखील झाला. त्यामुळे भारतातील प्रमुख शहरामध्ये तो विक्रीसाठी दाखल झाला आहे.
आफ्रिकन आंब्यामुळे कोकणातील हापूस उत्पादकांच्या भुवयादेखील चांगल्याच उंचावल्या आहेत. कोकणातील हापूस बाजारपेठेत येण्यास अजूनही २ महिन्याचा तरी अवधि आहे. पण सध्या बाजारात सहा महिने अगोदर आलेल्या आफ्रिकन आंब्यामुळे खव्याच्या नजरा आकर्षिल्या आहेत. आफ्रिकन आंबा चवीला व आकाराला कोकणातील हापूस आंब्यासारखाच आहे. फळांचा राजा बाजारात येण्यापूर्वी ३ महिमेपूर्वीच विक्रीला आला आहे. त्यामुळे तो कोकणातील हापूस आंब्याला हंगामापूर्वी पर्याय निर्माण झाला आहे. 

रत्नागिरी बाजारातही वाशी मार्केटमधून ‘आफ्रिकेंन ‘ आंबा विक्रीसाठी आला आहे. येथील विक्रेते सतीश पवार यांनी यांच्याकडून या आंब्याची विक्री केली जात आहे. आंबा खवय्यांची चव भागवण्यासाठी पहिल्यांदाच परदेशातून आंबा आला आहे. तसेच तो २,००० ते २,८०० रुपयांपर्यंत प्रति डझन विकला जात असल्याचे सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने