अजित पवार यांनी आज भाजप सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

अजित  पवार यांनी  आज भाजप सरकारला  पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ  घेतली. अजित पवार काल रात्री नऊ वाजेपर्यंत आमच्यासोबत होते. पण ते संपूर्ण बैठकीतून आमच्या नजरेला नजर भिडवून बोलत नव्हते .यांची बॉडी लँग्वेज  आमच्या लक्षात आली. शरद पवारांच्या लक्षात आले . ते बैठकीतून बाहेर पडले. फोन स्वीच ऑफ लागत होता. वकिलांकडे असल्याचे सांगण्यात आले होते.  कळले आता सकाळ कळले ते कोणत्या वकिलांकडे गेले होते, अशी टीका संजय राऊत शिवसेनेचे राज्यसभा खासदार यांनी केली.  
अजित पवार यांनी आज भाजप सरकारला पाठिंबा  देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये शरद  पवारांचा काहीचं हात नसल्याचे ठामपणे सांगू शकतो . जेव्हा पवारांना ईडीची नोटीस आली तेव्हाच मला कळले  होते. अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदनाम केले आहे. महाराजांच्या नावाला काळिमा फासला आहे.  राज्यातील जनता त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही , असा इशारा राऊत यांनी दिला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार आज भेटणार आहेत. त्यांच्यात सकाळपासून इट फोनवर चर्चा झाली . राजभवनात पाप करण्यात आले आहे  रात्रीच्या अंधारात तुम्ही डाका घातला. य तुम्ही चोरी केली आहे.महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे., ज्यांनी ह्या वयात शरद पवारांना  दगा देण्याचा प्रयत्न केलाय हि महाराष्ट्राला न आवडणारी गोष्ट आहे .काहीतरी चांगलं घडत असताना हे सर्व सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून करण्यात आल्याचा आरोप संज य राऊत यांनी केला,तसेच त्यांनी शरद पवारांना दगा दिला आहेच पन महाराष्ट्राच्या   पाठीत खन्जीर खुपसला आहे, अजित पवार हे आयुष्यभर तडफडत राहतील , अशी वक्तव्य त्यांनी केलं.    
  

शरद पवार अनभिज्ञ? 


शरद पवार साहेबाना सुरुवातीच्या काळात या गोष्टी होत्या. परंतु नंतरच्या काळामध्ये; पहिल्या   काळात त्यांना मी स्थिर सरकार देण्याबाबत सांगत होतो . कोणीतरी दोघांना किंवा तिघांना एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नव्हते ,  या आधीही स्थिर सरकार दिले आहे. शिवसेना - भाजपने स्थिर सरकार दिले आहे,असे अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर सांगितले 
 . 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने