शपथविधी काही तासांवर असताना अखेर अजित पवारांनी केला खुलासा

आजपासून राज्याच्या राजकारणाला नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे. ; परंतु महाविकास आघाडीवर अजित पवार नावाचे अनिश्चिततेचे वादळ अजूनही शमलेले नाही का? अशी विचारणा होत असताना त्यांनी स्वतः खुलासा केला . 
आज फक्त मुख्यमंत्री आणि इतर सहा मंत्र्याची शपथविधी होईल. त्यात प्रत्येक पक्षाचे दोन दोन मंत्री शपथ घेतील. आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे दोघे शपथ घेणार आहेत आहेत बाकीचा शपथं विधी विधानसभा अध्यक्ष निवडीची ठराव आणि बहुमताची चाचणी सिद्ध झाल्यानंतर होईल,की असे  अजित पवार यांनी सिल्वर ओक मधून बाहेर पडल्यानंतर सांगितले.. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत शपथ विधीला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
आज सायंकाळी ६ . ४० ला मुख्यमंत्री पदाची शपथ शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत. यावेळी त्याच्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील प्रत्येकी दोघे मंत्री शपथ घेणार आहेत. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ  मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेल्या घडामोडीवरून प्रदेशाध्यक्ष आणि गटनेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी  सांगितले कि उपमुख्यमंत्री कोण हे अजून ठरलेल नाही .तीन डिसेंबर नंतर पवार त्याबाबत निर्णय देतील. या घडामोडीमुळे अजित पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने