बहुमत चाचणीचा आज निर्णय

सर्वोच्च न्यायालयात उभय पक्षाच्या विकलांची खडाजंगी..... 

नवी दिल्ली :  
महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुमारे दीड तास झालेल्या उभय बाजूच्या वकिलांच्या खडाजंगीनंतर न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत राखून ठेवला आहे.  सर्वोच्च न्यायलयात मंगळवारी काय निकाल लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

बहुमत सिद्धतेसाठी राज्यपालांनी १४ दिवसांची मुदत वाढ दिली. 

maha-vikas-adhadi-image

बहुमत त्वरित सिद्ध करा :  काँग्रेस, सेने- राष्ट्रवादी वकिलांचा युक्तिवाद 

महाराष्ट्राचे सत्ता नाट्य गेलाय आठवड्याच्या अखेरीस सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. रविवारी सुट्टी असूनही न्यायमुर्ती एन; व्ही . रामण्णा , न्यायमुर्ती अशोक भूषण आणि न्यायमुर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने आया प्रकरणाची सुनावणी घेतली . यानंतर सोमवारी या प्रकरणाची सुनावणी घेत खंडपीठाने भाजप तसेच शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादीच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली. सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षाच्या वकिलांची खडाजंगी झाली.  मुख्यमंत्री फडणवीस याना विधानसभेत आज किंवा उद्या बहुमत सिद्ध करावे , अशी विनंती सेने- राष्ट्रवादी व काँग्रेसकडून ऍडव्होकेट कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी केली. 
भाजपची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी त्याला तीव्र विरोध केला. विधानसभेच्या काही परंपरा आहेत, कायदे आणि  नियम आहेत. सर्वप्रथम विधानसभेचा हंगामी अध्यक्ष निवडावा लागेल . आमदारांना शपथ द्यावी लागेल. अशा स्थितीत बहुमत चाचणी तत्काळ घेणे योग्य ठरणार नाही. किमान एक आठवडा बहुमताची चाचणी होऊ नये, असे रोहतगी यांनी सांगितले. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी १४ दिवसाचा वेळ निर्धारित केला असल्याची माहिती  रोहितगी यांनी दिली. 
सुनावणी दरम्यान एका याचिकेवर तीन- तीन वकील कसे, असा सवाल खंडपीठाने सिब्बल , सिंघवी व मजीद मेनन याना उद्देशून विचारला.  सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावर तीन पक्षाची एका वकिलावरही सहमती नसल्याची टिप्पणी केली. 
थोडे नवीन जरा जुने