महेंद्रसिग धोनीने चेन्नई सुपर किंग्सला दिले वचन : यापुढे वापरणार का कर्णधारपदाचे वजन

धोनीने आयपीएल मधील चेन्नई सुपर किंग्स संघाला खास वचन दिले आहे. यामध्ये आपण कर्णधार पदाचे वजन कधीपर्यंत वापरणार धोनीने खुलास केला आहे.


मुंबई: सध्याच्या घडीला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिग धोनीच्या निवृत्तीच्या बऱ्याच बातम्या येत आहेत.  भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या निवृत्तीबाबत भाष्य केले होते.हे सर्व सुरु असतानाच धोनीने आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाला खास वचन दिले आहे. यामध्ये आपले  कर्णधारपदाचे वजन कधीपर्यंत वापरणार, याबाबत धोनीने खुलासा केला आहे.

आगामी आयपीएलनंतर धोनीच्या आंतराष्ट्रीय कारकिर्दीबाबत निर्णय घेण्यात येईल असे शास्त्री यांनीम्हण्टले होते. त्यामुळे यंदा आयपीएल धोनीसाठी फार महत्वाचे असणार आहे. पण यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार कि नाही ,  याबद्दल अजून काही जणांचा संभ्रम आहे.

धोनी यंदाचा आयपीएल खेळणार का ?  धोनी आणि चेन्नई संघ यांच्यामध्ये याबाबत काय चर्चा झाली आहे  याबाबत टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्राने एक वृत्त दिले आहे. या वृत्तामध्ये धोनी आणि चेन्नई संघ आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये आयपीएलबद्दल चर्चा झाली असे म्हणटले आहे. त्याचबरोबर मी २०२१ पर्यंत  तरी चेन्नई संघाबरोबर कायम राहीन , असे धोनीने चेन्नई सांगितल्याचे वृत्तात म्हणले आहे. 

  भारतीय संघाचा  माझी कर्णधार महेंद्रसिग धोनी  याच्या निवृत्तीच्या चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागल्या आहेत. वर्ल्ड  कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. त्यानं दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज , बांगलादेश या मालिकांतून विश्रांती  घेतली आणि मायदेशात होणाऱ्या विंडीज विरुद्धच्या मालिकेतही त्याचा संघात समावेश नव्हता. त्यामुळे धोनीच्या डोक्यात नेमकं काय चाललंय , याचा अंदाज कुणालाही बांधता आला नाही ,पण धोनीच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवृत्तीचं टायमिंग ठरलेले  आहे आणि मी स्वतः त्याची घोषणा करेल, असे समजते . 

भारत विरुद्ध इंडिज यांच्यातल्या मालिकेतून माझी कर्णधार महेंद्रसिग  आंतरराष्टीय क्रिकेट मध्ये पुनरागमन करेल, असे वाटले होते. मात्र निवड समितीनं जाहीर केलेल्या टी २० आणि वन डे मालिकेत धोनीचं नाव नसल्याने सर्वांचा आश्यर्चचा धक्का बसला. 

धोनी विंडीजविरोधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय होऊ शकतो , अशा चर्चा होत्या. पण, आता धोनी नक्की कधी मैदानावर दिसेल ,अशी उत्सुकता लागून राहिली आहे.


महेंद्रसिंग धोनी मार्च २०-२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार , पण टीम इंडियाकडून नाही खेळणार. ?

 विंडीज मालिकेनंतर ऑस्टोलिया , श्रीलंका हे संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे या तिन्ही मालिकेत धोनीचा संघात समावेश नसेल. इंडियन प्रीमियर लीग च्या हंगामापूर्वी धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार आहे बांगलादेश येथे होणाऱ्या आशियाई एकादश आणि  जागतिक संघ यांच्यात दोन २०-२० सामने होणार आहेत. या दोन्ही सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा आहे आणि यात धोनी आशियाई संघाचे प्रतिनिधित्व करण्याची शक्यता आहे. १८ आणि २१ मार्च या तारखेला हे सामने होणार आहेत. 

इंडिअन प्रीमियर लीगनंतर धोनी निवृत्तीबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, “ आयपीएलनंतर धोनी त्याच्या भविष्याबाबत निर्णय घेईल. तो एक मोठा खेळाडू आहे आणि त्याच्या निवृत्तीबाबतच्या चर्चा होतच राहणार. महिला एका महिन्यापासून तो कसा कसून मेहनत घेत आहे आणि तो कसा तंदरुस्त आहे . आयपीएलपूर्वी धोनी किती स्पर्धात्मक सामने खेळतो , यावर सर्व अवलंबून आहे, असे ,सूत्रांनी सांगितले. 

थोडे नवीन जरा जुने