फडणवीसांसमोर ३ पर्याय : कसे वाचेल सरकार

विधानसभा अध्यक्ष निवड ठरेल नव्या सरकारच्या बहुमताची चाचणी. 

नवी दिल्ली : 
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस व अजित पवार याच्या सरकार समोर आता तीन मार्ग आहेत, बहुमत सिद्ध करणे आणि सरकार वाचवणे या संधीवर कोणत्याची परिस्थितीत भाजप पाणी फिरू देणार नाही असे चित्र आहे. सरकार वाचवण्याचे संभाव्य पर्याय कोणते असू शकतात, त्याची चाचपणी हाच एकमेव कार्यक्रम हेतू आहे. 
फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ५१ आमदाच्या पाठिंब्याचा दावा केलेला आहे. अजित पवार भाजपची साथ सोडायला तयार नाहीत. जयंत पाटील यांनी ट्विट करून परत घरी या असे आव्हान केले आहे. पण त्याचा आत्ता पर्यंत तरी काय उपयोग झालेला नाही. या ट्विटवर अजित पवार रात्री उशिरा फडणवीस याना “ वर्षां “ वर  पोहोचले आणि फडणीवस याना भेटले. 
१  ....... हे ते तीन मार्ग 
अजित पवार यांनी सर्व ५४ आमदारांच्या पाठींब्याचे पत्र राज्यपालांना देऊन ठेवलेले आहे. आता शरद पवार यांनी कामं हाती घेतल्यानंतर अजीत पवार दोन तृतीयांश म्हणजे ३६ आमदारांना भाजपच्या बाजूने वळवू शकतील काय? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे अजित पवारांकडे दुष्ट मार्ग १२-१५ समर्थक आमदारांचा बहुमत सिद्ध करण्याच्या वेळी अनुपस्तित राहण्यास भाग पाडणे हा असू शकतो. 
fadanvis

२...... 
फडणवीस यांनी पदाची शपथ घेण्याचा निर्णय एकट्या अजित पवार यांच्या भरवश्यावर भाजपने घेलेला नसावा. भाजपकडे “ प्लॅन बी “ असेल. अन्य पक्षातील काही आमदाराचा त्यांच्या पक्षतील व्हिपकडे दुर्लक्ष करून सभागृहासमोर पडण्यास राजी करणे, हा एक दुसरा मार्ग भाजपकडे असू शकेल ४ प्रमुख पक्षा व्यतिरीक्त अन्य २९ पैकी १४ आमदारांचा पाठींब्याचा दावा भाजप सुरुवातीपासून करत आहे. सरकार बनले  आहे. असे निश्चित होतच यात आणखी पाच सहा आमदारांची संख्या वाढू शकते. 
३....... 
भाजपचे  “सॉफ्ट टार्गेट “ काँग्रेसशी असू शकते. ४४ सदस्य काँग्रेसचे आहेत. भरीत भर म्हणजे काँग्रेसच्या आमदारांनी आपला विधानसभेतील नेताही अद्याप ठरवलेला नाही. अर्थात, हा काँग्रेसचा एखादा ठरविलेल्या रणनीतीचा भाग असू शकतो. माझी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आधीच स्पष्ट केलेले आहे कि, ज्या ज्या हॉटलातून काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीचे आमदार थांबले आहेत तिथे भाजपने हि खोल्या बुक करून ठेवल्या आहेत. 
चार नेत्याकडे जबाबदारी 
बहुमताचा आकडा खाली आणण्यासाठी भाजपने राधाकृष्ण विखे पाटील. नारायण राणे, बबनराव पाचपुते आणि गणेश नाईक या अन्य पक्षातून नव्याने आलेल्या नेत्याकडे विशेष जबाबदारी सोपवलेली आहे. 
सभापती निवडीतच दिलेली चुणूक । 
फडणवीस यांच्या बहुमताची झलक विधानसभेच्या सभापती निवडीतच दिसेल. ही एकप्रकारे “लिटमस टेस्ट “ असेल . राज्यपालांनी त्यांना ३० नोव्हेंबर पर्यंत बहुमत सिद्ध करायला सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा अवधी घटविला तर सर्वात आधी नवनिर्देशित आमदारांना पॅड आणि गोपनीयतेची शपथ दिली जाईल. हि जबाबदारी अस्थायी विधानसभा अध्यक्षांकडे असेल. पुढे पूर्वकालीन अध्यक्षची निवड अस्थायी अध्यक्षाच्या निरीक्षना खाली होईल. भाजपची पहिली परीक्षा याच निवडणुकीत झालेली असेल. भाजप आपल्या उमेदवाराला विजयी करू शकाल तर ती बहुमत सिद्ध करण्याची परीक्षा उत्तीर्ण ठरेल. 
बहुमत चाचणीची गणित [ २८८ जागा, १४५ वर बहुमत ] 
शिवसेना -काँग्रेस-राष्ट्रवादीचा दावा    भाजपकडून १७० आमदारांच्या तर अजित पवार एकटे 
आमच्याकडे  १६३ आमदार           पाठिंब्याचा दावा आधीपासूनच            पडले 
शिवसेना-५६ राष्ट्रवादी-५३               भाजप -१०५       भाजप -१०५ 
[अजीत पवार वगळता]                   राष्टवादी-५४               अजित पवार -१ 
काँग्रेस-४४                                   अजित पवार गटनेता म्हणून या एकूण -१०६ 
अन्य-९                                       आमदारांच्या साह्याने पत्र भाजपला बहुमताला ३९ कमी 
                                                 दिलेले आहे.]                                   
एकूण १६२                                  एकूण १७० 

अस्थीयी विधानसभा अध्यक्षांनी जर अजित पवार याना राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता मानले तर त्यांच्या व्हीप विरुद्ध मतदान केले म्हणून राष्ट्रवादीच्या ५३ च्या ५३ आमदारांची मते बाद ठरतील 

अशा परिस्तितीत बहुमताचा आकडा ११९ वर येईल आणि  भाजप -अजित पवार याना बहुमतासाठी १३ आणखी आमदारांची आवश्यकता असेल . 

थोडे नवीन जरा जुने